तापमान चाळीशीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 23:23 IST2019-03-23T23:22:53+5:302019-03-23T23:23:05+5:30
शहरातील तापमानाने चाळीशी गाठल्याने उन्हाची दाहकता जाणवू लागली आहे. तीन दिवस उन्हाच्या झळा कायम राहणार असून, ढगाळ वातावरण जाताच थोडी दाहकता कमी होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, २५ मार्चनंतर पूर्व विदर्भाला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

तापमान चाळीशीवर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील तापमानाने चाळीशी गाठल्याने उन्हाची दाहकता जाणवू लागली आहे. तीन दिवस उन्हाच्या झळा कायम राहणार असून, ढगाळ वातावरण जाताच थोडी दाहकता कमी होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, २५ मार्चनंतर पूर्व विदर्भाला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
राजस्थान व मध्य प्रदेशावर चक्राकार वारे, मध्य प्रदेश ते कर्नाटकवर कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने वाऱ्याचा वेग वाढला आहे. परिणामी विदर्भातील तापमानात वाढ झालेली आहे. पंधरा दिवसांपूर्वी ३२ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान असलेले तापमान आता ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे उन्हाची दाहकता जाणवत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. ही स्थिती आणखी तिन दिवस कायम राहणार असून, ढगाळ वातावरण गेल्यावर थोडे तापमान कमी होण्याचे संकेत आहे.
मध्यप्रदेश, राजस्थानकडे चक्राकार वारे आहे, मध्यप्रदेश व कर्नाटक कमी दाबाची द्रोणीय स्थिती असून वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ झाली आहे. या स्थितीत २५ मार्चनंतर पूर्व विदर्भाला पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
अनिल बंड
हवामान तज्ज्ञ, अमरावती.