सांगा, आश्रमात जायचे कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:13 IST2021-03-05T04:13:16+5:302021-03-05T04:13:16+5:30
भाविकांचा प्रश्न : कंत्राटदाराचे दुर्लक्ष वरूड : वरूड - आष्टी मार्गाच्या सिमेंटीकरणादरम्यान रस्त्याच्या कडेला नालीचे बांधकाम करण्यात आले. मात्र, ...

सांगा, आश्रमात जायचे कसे?
भाविकांचा प्रश्न : कंत्राटदाराचे दुर्लक्ष
वरूड : वरूड - आष्टी मार्गाच्या सिमेंटीकरणादरम्यान रस्त्याच्या कडेला नालीचे बांधकाम करण्यात आले. मात्र, महर्षी अरविंद आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर खडबडीत आणि नाली असल्याने ये-जा करण्यास त्रास होत आहे. वाहने नेता येत नाहीत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रार देऊन तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे.
तालुक्यातील हातुर्णा येथे महर्षी अरविंद आश्रम आहे. या आश्रमात जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. परंतु वरूड ते आष्टी या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या नाल्या बांधण्यात येत आहे. सदर रस्त्याचे काम हातुर्णा येथे सुरू आहे. आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच नाली आणि रस्त्यामुळे आश्रमात जाणे येणे शक्य होत नाही. प्रवासी तसेच मालवाहू वाहनसुद्धा नेता येत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.
------------