मेळघाटात साकारला जाणार टेलिमेडिसिन पथदर्शी प्रकल्प
By Admin | Updated: December 16, 2014 22:43 IST2014-12-16T22:43:01+5:302014-12-16T22:43:01+5:30
मेळघाटातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी नागरीकांना अनेकवेळा उपचारासाठी जवळपासचे शहर गाठणे भौगोलिक दुष्टया शक्य होत नाही. बरेच वेळा अगदी क्षुल्लक कारणांसाठी आवश्यकता

मेळघाटात साकारला जाणार टेलिमेडिसिन पथदर्शी प्रकल्प
अमरावती : मेळघाटातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी नागरीकांना अनेकवेळा उपचारासाठी जवळपासचे शहर गाठणे भौगोलिक दुष्टया शक्य होत नाही. बरेच वेळा अगदी क्षुल्लक कारणांसाठी आवश्यकता नसतानाही वेळ व पैसा खर्च करावा लागतो. अशा दुर्गम भागात राहणाऱ्या नागरीकांची गरज लक्षात घेता आरोग्य विभागाने आता मेळघाटसह अन्य तिन ठिकाणी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे टेलिमेडीसिन पथदर्शी प्रकल्प राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
या टेलिमेडीसिन पथदर्शी प्रकल्पातुन कुठल्या कुठल्या आजावर उपचार करता येणे शक्य आहे याबाबतचा विस्तुत अभ्यास करण्यासाठी एक तज्ञाची अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे. या अभ्यास समितीचा अंतीम अहवालानंतर मेळघाटात प्रायोगिक तत्वावर टेलिमेडीसिन पथदर्शी प्रकल्प सुरू केला जाणार आहे .
दुर्गमगावासाठी उपक्रम
टेलिमेडीसिन पथदर्शी प्रकल्पाच्या अभ्यास समितीचे काम सुरू होणार आहे . या पथदर्शी प्रकल्पा करीता या ठिकाणी इंटरनेट, व व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातुन मुंबईला जोडले जाणार आहे.पंतप्रधानानी नुकतेच ड्रिम प्राजेक्ट मध्ये देशभरातील आरोग्य केंद्र टेलिमेडीसिनच्या माध्यमातुन जोडण्याचा निर्णय घेतला आहे होता . त्या अनुष्ांगाने हा प्रकल्प राबविला जाणार आहे .या प्रकल्पाअंतर्गत रूग्णावर उपचार डोस ल एक्सरे, सोनोग्राफी ,सिटी स्कॅन आदी ा चाचण्याच्या माध्यमातुन मुंबईतील तज्ञ्ज्ञ डॉक्टररांच्या उपचाराच्या दुष्टीने मार्गदर्शन करणार आहेत .