महिलांची छेड, चौघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा !,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:17 IST2021-09-04T04:17:07+5:302021-09-04T04:17:07+5:30

वरूड : स्थानिक पांढुर्णा चौक परिसरातील एका हॉटेलमध्ये वाढदिवसानिमित्त जेवायला गेलेल्या महिला आणि मुलींची छेड काढल्याप्रकरणी महिलेच्या ...

Teasing of women, crime of molestation against four !, | महिलांची छेड, चौघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा !,

महिलांची छेड, चौघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा !,

वरूड : स्थानिक पांढुर्णा चौक परिसरातील एका हॉटेलमध्ये वाढदिवसानिमित्त जेवायला गेलेल्या महिला आणि मुलींची छेड काढल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून वरूड पोलिसांनी चार युवकांविरुद्ध विनयभंगासह धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला. यातील दोघांना अटक केली असून, दोघे पसार झाले.

पोलीस सूत्रानुसार, मोहसीन बेग सलीम बेग, सय्यद वसीम सय्यद रशीद, नदीम शेख मिर्झा फिरोज खान जब्बीर खान (सर्व रा. वरूड) असे आरोपींचे नाव आहे. फिर्यादीसोबत तीन महिला पांढुर्णा चौकातील एका हॉटेलमध्ये बुधवारी रात्री ९ वाजता जेवायला गेले होते. त्यांचा पाठलाग करीत आरोपी हॉटेलमध्ये जाऊन ''तुमने नकाब क्यू नाही पहना'' ; तुम नीचे आओ तुम्हे बताता हू '',तर एकाने मोबाईलेमध्ये शूटिंग घेतली. एकाने पाठलाग केला आणि हात पकडला, असे तक्रारीत नमूद आहे. यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३५४(अ)(१)(१), ३५४(ड)(२), ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. यातील मोहसीन बेग सलीम बेग, सय्यद वसीम सय्यद रशीद या दोघांना अटक केली, तर दोघे पसार झाल्याने वरूड पोलीस त्यांचा शोध घेत आहे. पुढील तपास ठाणेदार प्रदीप चौगावकर यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक साळूंखेसह पोलीस करीत आहे.

Web Title: Teasing of women, crime of molestation against four !,