शिक्षकांच्या बदली प्रक्रियेवरील स्थगिती उठविली
By Admin | Updated: July 3, 2016 00:11 IST2016-07-03T00:11:19+5:302016-07-03T00:11:19+5:30
जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे समायोजन आणि बदली प्रक्रियेवरील स्थगिती रद्द करण्यात आली आहे.

शिक्षकांच्या बदली प्रक्रियेवरील स्थगिती उठविली
जिल्हापरिषद : ८ जुलैपर्यंत बदल्या
अमरावती : जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे समायोजन आणि बदली प्रक्रियेवरील स्थगिती रद्द करण्यात आली आहे. १३ जून रोजी आ. श्रीकांत देशपांडे यांच्या हवाल्याने या बदली प्रक्रियेस स्थगिती देण्यात आली होती. १ जुलैच्या पत्रानुसार स्थगिती रद्द करून बदल्याची कार्यवाहीची सूचना जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्या आहेत.
ग्रामविकास आणि जलसंधारण विभागाचे कक्ष अधिकारी संजय कुडवे यांनी याबाबत १ जुलै रोजीच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. स्थगिती उठविल्याने आता ८ जुलैपर्यंत समायोजन व बदली प्रक्रिया होणार आहे. समायोजन व बदल्यांचे आदेश निर्गमित केल्यानंतर त्याच दिवशी उच्च न्यायालयाात कॅव्हेट दाखल करावे, हे करताना कोणत्याही न्यायालयीन निर्णयाचाभंग होणार नाही तसेच आटीईची पालन होईल. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता बाळगण्याचे सूचना कक्ष अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांना दिल्या आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांनी केलेले समायोजन व बदली प्रक्रियेवर अनेक शिक्षक संघटना नाराज होत्या. दोन दिवस सायंस्कोरवर शिक्षकांची बदल्यांसाठी जत्रा झाली असतांना १३ जूनला या बदल्यांवर स्थगिती आणल्या गेली होती हे विशेष.