मराठी अस्मिता दिनानिमित्त शिक्षकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:22 IST2021-03-04T04:22:22+5:302021-03-04T04:22:22+5:30
वरूड : जागतिक मराठी दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने तालुक्यातील शिक्षकांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा शाल-श्रीफळ देऊन गौरव ...

मराठी अस्मिता दिनानिमित्त शिक्षकांचा गौरव
वरूड : जागतिक मराठी दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने तालुक्यातील शिक्षकांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा शाल-श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनसेचे नेते अण्णा भोंगाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून अंजली पोटे, आमनेर येथील ग्रामपंचायत सदस्य रमेश जीवनकर, संगीत शिक्षक रवींद्र साबळे, शुभांगी कावनपुरे, प्रतीक्षा खापरे आदी उपस्थित होते. अंजली पोटे, रमेश जीवनकर, रवींद्र साबळे, शुभांगी कावनपुरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाकरिता तालुका अध्यक्ष रोशन लोखंडे, शहर अध्यक्ष पवन राऊत, बाबू काकडे, चंदू मोहोड, वसीम शाह, सय्यद अनिस, राजकुमार वानखडे, पवन गुल्हाने, जावेद शेख, निखिल धर्माळे, शकील शेख, अरुण तरार, शुभम रामटेके, शुभम पोहरकर, आकाश काठीवाले यांनी परिश्रम घेतले. संचालन रीतेश राईकवार यांनी केले.