शिक्षकदिनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे शिक्षकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:16 IST2021-09-07T04:16:26+5:302021-09-07T04:16:26+5:30

धारणी : शहरातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मुलांची शाळा येथे शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात धारणी तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ...

Teachers' Day honors teachers on behalf of Nationalist Women's Congress | शिक्षकदिनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे शिक्षकांचा सन्मान

शिक्षकदिनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे शिक्षकांचा सन्मान

धारणी : शहरातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मुलांची शाळा येथे शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात धारणी तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी रामू जारेकार होते. प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी विजय नांदूरकर, कळमखार माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक रमेश नांदूरकर उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रभुदास बिसंदरे यांनी केले. यावेळी महिला राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दुर्गा बिसंदरे व शहराध्यक्ष नर्मदा गवई यांच्या हस्ते शाल-श्रीफळ देऊन सत्कार करून सन्मानित करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन करुणा वर्धे , प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रभुदास बिसंदरे व आभार प्रदर्शन दीपमाला मालवीय यांनी केले. दीपक पाचोळकर, बन्सी कासदेकर, नंदा तेलगाव, शिवाजी क्षीरसागर यांच्यासह इतर शिक्षकांनी आयोजनाकरिता परिश्रम घेतले.

Web Title: Teachers' Day honors teachers on behalf of Nationalist Women's Congress