शिक्षक बँकेच्या मतमोजणीत गैरप्रकार!
By Admin | Updated: November 17, 2015 00:18 IST2015-11-17T00:18:34+5:302015-11-17T00:18:34+5:30
अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणूक मतमोजणीदरम्यान झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्यात यावी,...

शिक्षक बँकेच्या मतमोजणीत गैरप्रकार!
उमेदवारांचा आरोप : पालकमंत्र्यांकडे तक्रार
अमरावती : अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणूक मतमोजणीदरम्यान झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बँकेचे नवनियुक्त संचालक किरण पाटील यांच्यासह इतर उमेदवारांनी केला आहे. या संदर्भात पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.
७ नोव्हेंबरला शिक्षक बँकेच्या २१ संचालक निवडीसाठी ९० टक्के मतदान होऊन ८ नोव्हेंबर रोजी मतमोजणी करण्यात आली. सर्वसाधारण मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना मतमोजणी प्रतिनिधी व उमेदवार दोन्हीकडे एकाचवेळी लक्ष ठेवू शकले नाही, असा आरोप किरण पाटील यांच्यासह ज्योती उभाड व इतरांनी घेतला आहे.
कैलाश कडू यांना २०९५ मते मिळाल्याचे जाहीर झाल्यानंतर त्यांना विजयी घोषित करण्यात आले नाही. त्यांच्यापेक्षा कमी मते असलेल्या छोटसिंग सोमवंशी आणि सुदाम राठोड यांना विजयी घोषित करण्यात आले. ज्योती उभाड यांच्यासाठी फेरमतमोजणीची मागणी केली असताना निवडणूक निर्णय अधिकारी गौतम वालदे यांनी ती फेटाळली. या पार्श्वभूमीवर कैलास कडू व ज्योती उभाड यांच्यावर निश्चितपणे अन्याय झाला असल्याचा आरोप या शिक्षकांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे. या निवेदनावर चंदन खर्चान, राजेंद्र होले, अरविंद बनसोड, अरविंद महल्ले, सुरेंद्र विघे, उमेश गोदे, किशोर मुंदे अािण कैलास कडू यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.