शिक्षकांची सीईटीने नियुक्ती
By Admin | Updated: January 8, 2016 00:33 IST2016-01-08T00:33:06+5:302016-01-08T00:33:06+5:30
जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त असतांनाही ती भरण्यावर राज्याच्या शिक्षण विभागाने मनाई केली आहे.

शिक्षकांची सीईटीने नियुक्ती
पायबंद : प्रक्रियेवर शिक्षण विभागाची टाच
अमरावती : जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त असतांनाही ती भरण्यावर राज्याच्या शिक्षण विभागाने मनाई केली आहे. अशा सर्व रिक्त जागा या केवळ सीईटीने भरल्याचे सक्त आदेश जारी करण्यात आले आहेत.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त आहेत. या जागा भरण्याबाबत शिक्षक संघांकडून वारंवार मागणी केली जाते. अशा रिक्त जागा भरण्याबाबत शासनाने प्रक्रिया ही सुरू केली होती. मात्र या प्रक्रियेला आता स्थिगिती देण्यात आली आहे. शिक्षकांची रिक्त पदे भरल्यास राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने मनाई केली आहे. खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाअंतर्गत येण्याचा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांची किंवा पदभरती करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालयाने जारी केले आहे. शिक्षक संचालक एन. के. जरग यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना या बाबतचे पत्र पाठविले आहे. सर्व उपसंचालकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांना याबाबत कळवावे, असे या पत्रात म्हटले आहे. राज्यातील सर्व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांतील शिक्षकांच्या जागा केवळ भरतीपूर्व केंद्रीय निवड परीक्षेच्या माध्यमातून भरल्या जाव्यात, असे पत्रात नमून करण्यात आले आहेत. त्यामुळे सीसीईटीचा निकाल लागेस्तोवर खासगी शाळांमधील जागा आता भरल्या जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)
रिक्त पदांची माहिती मागविली
जिल्ह्यासह राज्यात सर्व रिक्तपदांची माहिती गोळा करण्यात प्राथमिक शिक्षक संचालनालयाने सुरुवात केली आहे. विविध जिल्ह्यात किती जागा रिक्त आहेत. याचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात १ जानेवारी २०१६ पर्यंत शिक्षकांची किती पदे रिक्त आहेत. याची विस्तृत माहिती शिक्षण संचालनालयाने मागविली आहे. या आधारे फक्त रिक्त पदांची माहिती एकत्रित होणार आहे. त्यानंतर पदे सीआईटीच्या माध्यमातून भरली जाणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे.