शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खाद्यावर बदूक ठेवून चालवली 'गोळी'
3
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
4
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
5
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
6
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे
7
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
8
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
9
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
10
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
11
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
12
Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ!
13
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
14
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
15
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
16
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
17
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
18
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
19
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
20
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...

नगरपालिका शाळेची कामगिरी ऐकून शिक्षक अवाक्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 01:02 IST

देशातील सर्वाधिक पटसंख्येची शासकीय शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराडच्या नगरपालिका शाळा क्र. ३ चे मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांनी शाळेची कामगिरी मांडल्यानंतर अमरावती महापालिकेचे शिक्षक अवाक् झाले.

ठळक मुद्देअर्जुन कोळी यांनी उलगडले गमक : अमरावती महापलिका शिक्षक संघटनेचा कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशातील सर्वाधिक पटसंख्येची शासकीय शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराडच्या नगरपालिका शाळा क्र. ३ चे मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांनी शाळेची कामगिरी मांडल्यानंतर अमरावती महापालिकेचे शिक्षक अवाक् झाले. २३९७ पटसंख्येच्या या शाळेची वार्षिक उलाढाल एक कोटी रुपयांची आहे.राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या अमरावती शाखेच्यावतीने मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांच्या उद्बोधनाचे आयोजन सोमवारी अंबापेठ येथील महापालिका शिक्षण विभागाच्या सभागृहात करण्यात आले होते. महापालिका शिक्षणाधिकारी अनिल कोल्हे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. मुख्याध्यापक कोळी म्हणाले, २०११ मध्ये चार शिक्षक आणि २४० पटसंख्या अशी कराड नगरपालिका शाळा क्र. ३ ची अवस्था होती. आताच्या स्थितीत पटसंख्या २३९७ आणि ७२ शिक्षक आहेत. येथील बालवाडीमध्ये ७०० बालके शिक्षण घेतात. पहिलीच्या प्रवेशाकरिता आलेल्या १२०० अर्जांपैकी ४०० प्रवेशानंतर प्रक्रिया थांबविण्यात आली. शाळेच्या परिसरात आधी दारू पिणारे लोक दिसायचे. आता ही राज्यातील एकमेव कॉपोर्रेट शाळा आहे. प्रत्येक वर्ग डिजिटल व वर्गात एसी आहे. राज्यातील पहिले आयएसओ नामांकन प्राप्त या शाळेसाठी मागील पाच वर्षांत लोकसहभागातून ७० लाख रोख जमा झाले. शाळेची वार्षिक उलाढाल एक कोटी रुपये आहे. एवढेच नव्हे तर, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, अधिकारी, अभियंते, डॉक्टरची मुले आमच्या शाळेचे विद्यार्थी आहेत. यासाठी शाळेने विशेष प्रयत्न केले. येथील शिक्षक ‘माझी शाळा’ समजून काम करतात. दररोज मुख्याध्यापक-शिक्षक सुसंवाद होतो. नियमित पालक सभा होते व पालकांना आपलेपणाची वागणूक मिळते. शिक्षक शिकविण्यासाठी अतिरिक्त वेळ देतात. इयत्ता पहिलीचा पाया भक्कम करण्यावर आम्ही भर दिल्याने पुढचा मार्ग सुकर झाला. शाळेच्या यशात महिला शिक्षकांचा अमूल्य वाटा असल्याचेही ते म्हणाले. उपस्थित शिक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या उद्बोधनाचे स्वागत केले. याप्रसंगी अध्यक्ष योगेश पखाले, सतीश मिलांदे, रोशन देशमुख, योगेश चाटे, चेतना बोंडे, मनीषा गावनर, प्रफुल्ल अनिलकर, चेतन आर्विकर, आशीष कोपुळ, नरेश राजगिरी यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Schoolशाळा