शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

म्हणाला, बाहेरून फिरून येऊ; शाळकरी विद्यार्थिनीला 'बॅड टच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 11:44 IST

शिक्षक अटकेत : फ्रेजरपुऱ्यात गुन्हा, एक दिवसाची कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : कंत्राटी शारीरिक शिक्षकाने आपल्या मुलीला शाळेत 'बॅड टच' केल्याची फिर्याद एका महिलेने फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. १७ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास तो प्रकार घडल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी, फ्रेजरपुरा पोलिसांनी २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी रियाज नामक पीटी टीचरविरुद्ध विनयभंग व पोस्कोन्वये गुन्हा दाखल केला. तथा तातडीने त्याला अटकदेखील करण्यात आली. फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महापालिकेच्या एका शाळेत तो प्रकार घडला. मो. रियाजऊद्दीन (५०, रा. चपराशीपुरा) असे आरोपी शिक्षकाचे पूर्ण नाव आहे. 

फिर्यादी महिलेची १४ वर्षीय मुलगी मनपाच्या एका शाळेची विद्यार्थिनी आहे. २२ ऑगस्ट रोजी फिर्यादी महिला ही कामाला जात असताना पीडिताने तिच्याशी घडलेला अश्लाघ्य प्रकार आईच्या कानावर घातला. त्यानुसार, १७ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास ब्रेकदरम्यान त्या शाळेतील एक मुलगी आजारी पडली. त्यामुळे शिक्षकांनी तिला वर्गात नेऊन बसविले. तथा सर्व मुले-मुली तिच्याभोवती गोलाकार जमा झाले. त्यावेळी १४ वर्षीय पीडित मुलगी ही सर्व मुलामुलींच्या मागे उभी होती. त्यावेळी पीटी शिक्षक रियाज हा आपल्या मागे येऊन उभा राहिला. तथा त्याने आपल्याला बॅड टच केल्याची माहिती पीडिताने आईला दिली. आरोपीचा हात झटकून आपण तेथून बाजूला झाले. यापूर्वीदेखील रियाज सरने आपल्याला 'बाहेर फिरून येऊ' असे म्हटले होते, असेही तिने सांगितल्याने पीडिताच्या आईने शाळा गाठली. तथा ती बाब संबंधित मुख्याध्यापकांना सांगितली. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. आरोपीला अटक केली असून, त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती फ्रेजरपुऱ्याचे ठाणेदार नीलेश करे यांनी 'लोकमत'ला दिली.

महापालिकेकडून कार्यमुक्ततेची कारवाई रियाजउद्दीन हा गेल्या दीड ते दोन वर्षापासून अमरावती महापालिकेत कंत्राटी तत्त्वावर शारीरिक शिक्षक म्हणून कार्यरत होता. गुरुवारी गुन्हा दाखल होताच व अटकेची माहिती मिळताच त्याला तातडीने कार्यमुक्त करण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी सकाळी उपायुक्त माधुरी मडावी यांनी 'ती' शाळा गाठून वस्तुस्थिती जाणली. मुख्याध्यापक, शिक्षकांना अनुषंगिक निर्देश दिले. यावेळी शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम व सिस्टिम मॅनेजर अमित डेंगरेदेखील उपस्थित होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती