शिकवणीकरिता शिक्षकांनी नेमले शिक्षक मित्र ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:12 IST2021-04-05T04:12:16+5:302021-04-05T04:12:16+5:30
वरूड : कोरोनाचा प्रसार होऊ नये, शिक्षण विभागाने ऑनलाईनचे भूत आणले. ते सर्वांच्या डोक्यात शिरले. परंतु, याकरिता ...

शिकवणीकरिता शिक्षकांनी नेमले शिक्षक मित्र ?
वरूड : कोरोनाचा प्रसार होऊ नये, शिक्षण विभागाने ऑनलाईनचे भूत आणले. ते सर्वांच्या डोक्यात शिरले. परंतु, याकरिता ग्रामीण पालक डिजिटल मोबाईल खरेदी करणार तरी कसा, हा प्रश्न आहे. शिक्षकांना शाळेत हजेरी लावणे आवश्यक आहे. परंतु, आदिवासीबहुल भागातील तसेच कष्टकरी, ग्रामीण भागातील मुले शिकणार कशी, हा प्रश्न आहे. याकरिता शिक्षकांनी शक्कल लढवून डिजिटल मोबाईल असलेले शिक्षकमित्र तयार केले. त्यांचे मोबाईलवर ऑनलाईन धडे गिरवून ते गावातील पाच-दहा मुलांना चावडीवर बसवून शिक्षण देतात. परंतु शिक्षण विभाग सुस्त असून, पालक त्रस्त झाले आहेत. बालपणातच चष्मे लावण्याची वेळ आली. शेकडो बालकांचे डोळे तपासण्यात येत आहे.
मोबाईलच्या किरणोत्सारामुळे चिमुकल्यांना दृष्टिदोष होत आहे. एकीकडे कोरोनाची भीती म्हणून शाळा महाविद्यालये बंद आहेत. ऑनलाईन शिक्षणाच्या ओझ्याखाली दृष्टिदोषाच्या आजाराने तोंड वर काढले आहे. बालपणातच विद्यार्थ्यांना चष्म्याची आवश्यकता भासू लागली आहे. यामुळे देशाच्या भविष्याला व्याधीचे ग्रहण लागले. मोबाईलच्या अतिवापरामुळे किरणोत्सारामुळे दृष्टी आजाराने ग्रासले आहे. शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षण बंद करावे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून शाळेतच एक दोन मीटरच्या अंतराने विद्यार्थ्यांना बसवून फळ्यावरच शिक्षण सुरु करून दृष्टीदोषापासून मुक्ती द्यावी, अन्यथा येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षणामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी चिंता पालकांनी व्यक्त केली आहे.
कोट
ऑनलाईन शिक्षणामुळे ५ ते १८ वर्षे वयोगटातील दृष्टिदोष रुग्णांची संख्या वाढली. विद्यार्थी मोबाइलचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याने होणाऱ्या किरणोत्सारामुळे दृष्टिदोषाचे प्रमाण वाढले असून, डोळे कोरडे पडतात. चष्म्याचे नंबर वाढले आहेत. तपासणीकरिता येणाऱ्यांमध्ये विद्यार्थीसंख्या मोठी आहे. सतत किरणोत्सार होत असल्याने डोळ्यावर विपरीत परिणाम होत आहे.
राजेंद्र राजोरिया, नेत्रतज्ज्ञ, वरूड
----