शिक्षक बँकेविरूध्द सभासदांचे उपोषण
By Admin | Updated: December 31, 2014 23:18 IST2014-12-31T23:18:29+5:302014-12-31T23:18:29+5:30
दि जिल्हा परिषद शिक्षक बँकेच्या अन्यायकारक कर्ज धोरणाविरोधात विरोधात न्याय मागण्यासाठी शिक्षक बँकेच्या सभासदांनी बँकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

शिक्षक बँकेविरूध्द सभासदांचे उपोषण
अमरावती : दि जिल्हा परिषद शिक्षक बँकेच्या अन्यायकारक कर्ज धोरणाविरोधात विरोधात न्याय मागण्यासाठी शिक्षक बँकेच्या सभासदांनी बँकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा बुधवार हा चौथा दिवस आहे.
शिक्षक बँकेसमोर उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांच्या न्याय्य मागण्यामध्ये शिक्षक बँक सध्या राबवित असलेल्या कर्ज धोरणात अन्यायकारक असलेला बदल करावा, शिक्षक सभासदांचे कर्ज मंजूर करण्यासाठी थकीत कर्ज भरण्याची अट त्वरीत रद्द करावी, शिक्षक सभासदांचे कर्ज मंजूर करण्यासाठी शिक्षक सभासदाने कर्जाच्या २५टक्के रक्कम भरलीच पाहिजे ही अटही रद्द करावी, शिक्षक सभासदाला अर्जातील पगार पत्रकात जर कोणत्याच बँकेचा उल्लेख नसेल तर त्याला ईतर बँक व सोसायटीचे निरंक दाखले आणण्यास बंधनकारक करू नये, बँकेचा कर्जावरील व्याजदर १३ टक्याऐवजी ११ टक्के करावा कर्ज कपातकरणे आणि ही कपात कशी राहणार याकरिता कमेटी स्थापन करावी, सभासदाच्या पत्रव्यवहाराची दखल घेण्यात यावी, नोकर भरतीचे धोरण व अनावश्यक कर्मचारी कपात करावी अशा मागण्यांसाठी शिक्षक बँकेचे सभासद सत्येंद्र अभ्यंकर, कै लास डहाळे, डिंगाबर जामनिक, राजेश इचे, विनोद खाकसे, प्रमोद कडू, सुदर्शन चामलोट आदीचा उपोषण कर्त्यामध्ये समावेश आहे.
मागील चार दिवसापासून उपोषण सुरू असतानाही बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र याची दखल घेतली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे .( प्रतिनिधी )