शिक्षकाची विद्यार्थ्यासह आईलाही मारहाण
By Admin | Updated: January 1, 2015 22:55 IST2015-01-01T22:55:00+5:302015-01-01T22:55:00+5:30
येथील फातीमा कॉन्व्हेंट हायस्कूलचा इयत्ता दहावीच्या आदिवासी विद्यार्थ्याला क्षुल्लक कारणावरुन बेदम मारहाण केल्याचे कारण विचारण्यासाठी गेलेल्या आई सुमेरी कासदेकर यांनासुध्दा

शिक्षकाची विद्यार्थ्यासह आईलाही मारहाण
फातिमा कॉन्व्हेंटमधील घटना : शिक्षकावर कारवाईची मागणी
अचलपूर : येथील फातीमा कॉन्व्हेंट हायस्कूलचा इयत्ता दहावीच्या आदिवासी विद्यार्थ्याला क्षुल्लक कारणावरुन बेदम मारहाण केल्याचे कारण विचारण्यासाठी गेलेल्या आई सुमेरी कासदेकर यांनासुध्दा शिक्षकाने मारहाण केल्याच्या तक्रारीहून सदर शिक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आदिवासी समाज विकास संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
येथील फातिमा कॉन्व्हेंटमध्ये इयत्ता दहावी शिकत असलेला विद्यार्थी कुणाल महादेव कास्देकर याला २३ डिसेंबर रोजी वर्गशिक्षक आशिष सुरोले यांनी बेदम मारहाण केली. याची माहिती कुणालने त्याची आई सुमेरी कासदेकर यांना दिल्यावरुन त्या थेट शाळेत पोहोचल्या. मुलाला मारहाण केल्याचे जाब विचारले असता, शिक्षक सुरोले यांनी आईला सुध्दा मारहाण केल्याने आदिवासी विकास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संताप व्यक्त करीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर शिक्षकावर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांना दिले होते. सदर प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी ठाणेदार गिरीश बोबडे यांच्याकडे देण्यात आली असून याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे बोबडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
महिला पोलीस ‘आई नाही का?’
विद्यार्थी कुणाल कास्देकर याची आई सुमेरी कास्देकर या सरमसपुरा पोलीस ठाण्यात महिला पोलीस म्हणून कार्यरत आहेत. मुलाला शिक्षकाने बेदम मारहाण केल्याची माहिती मिळताच त्या व्याकुळतेने शाळेत पोहचल्या. वर्ग खोलीत कोंडून मारहाण करेपर्यंत मुलाने असा कोणता गुन्हा केला, याची विचारणा त्या मातेने केली. त्यावर आपली नामुष्की होत असल्याचे पाहून शिक्षकाने सुमेरी कास्देकर यांनासुध्दा जातीवाचक शिवीगाळ केली व मारहाणही केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कर्तव्य बजावत असताना आपण आईसुध्दा आहे. त्यावर मुलासाठी शाळेत गेले व तेथून परतवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी गेल्या. तेथे ५ ते ६ तास त्यांची तक्रारच पोलिसांनी घेतली नसल्याचा आरोप आदिवासी विकास संघटनेने केला आहे.