तहसील कार्यालय घेणार का मोकळा श्वास?
By Admin | Updated: March 18, 2016 00:15 IST2016-03-18T00:15:27+5:302016-03-18T00:15:27+5:30
स्थानिक तहसील कार्यालयालगतचा मुख्य रस्ता अतिक्रमणाने गिळंकृत केला आहे.

तहसील कार्यालय घेणार का मोकळा श्वास?
अतिक्रमण : अस्तव्यस्त पार्किंग, रस्ते गिळंकृत, पत्रव्यवहाराचाही परिणाम नाही
अमरावती : स्थानिक तहसील कार्यालयालगतचा मुख्य रस्ता अतिक्रमणाने गिळंकृत केला आहे. ११० पेक्षा अधिक महसुली खेड्यांचा कारभार हाकणाऱ्या प्रशासकीय इमारतीत ही अतिक्रणाची घेराबंदी करण्यात आली आहे. वारंवार पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करून ही हा भाग केव्हा मोकळा श्वास घेईल, याबाबत उत्तर द्यायला कुणीही तयार नाही.
प्रभात चौकालगत मध्यमवस्तीमध्ये अमरावती तहसील कार्यालयाची प्रशासकीय इमारत आहे. यात तहसील कार्यालयाशी संलग्नित असलेल्या महसुली खेड्यांची संख्या जशी वाढली, त्याच तुलनेत येथे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांचीही वाढ झाली. आता या परिसरात एजंटने इतके जाळे विणले आहे की, अतिक्रमण करून सार्वजनिक जागाच दडपली आहे. वर्ष दोन वर्षांत तर येथील अतिक्रमणाने कमालीचा उच्चांक गाठला आहे. यामुळे समस्या वाढली आहे.