शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

नळाला लागतात ‘टिल्लू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:39 IST

वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नळालाच मशीन लावून पाणी ओढले जात असल्यामुळे प्रामाणिक ग्राहकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. मशीन लावून पाणी खेचणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्याची जबाबदारी मजीप्रा प्रशासनाची असताना, या विषयातही अधिकारी वर्ग हतबल असल्याचे दिसून येत आहे.सिंभोरा धरणावरून अमरावतीकरांना पाणीपुरवठा होतो, मासोद ...

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : पाणीपुरवठ्याचे नियोजन बिघडले

वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नळालाच मशीन लावून पाणी ओढले जात असल्यामुळे प्रामाणिक ग्राहकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. मशीन लावून पाणी खेचणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्याची जबाबदारी मजीप्रा प्रशासनाची असताना, या विषयातही अधिकारी वर्ग हतबल असल्याचे दिसून येत आहे.सिंभोरा धरणावरून अमरावतीकरांना पाणीपुरवठा होतो, मासोद येथील जलशुद्धीकरण केंद्राहून ग्राहकांच्या घरापर्यंत शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. यादरम्यान पाइप लाइनमधून होणारी गळती व पाणीचोरीमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. मजीप्रा ९० हजारांवर ग्राहकांना पाणीपुरवठा करते. यापैकी ५० टक्क्यांवर ग्राहक मशीनद्वारे पाणी खेचत असल्याचे निदर्शनास आले. त्यातच आता उन्हाळाचे दिवस आहे. एक दिवसाआड अर्थात ७२ तासानंतर तास-दोन तास पाणीपुरवठा केला जातो. त्यातच टिल्लू पंप लावून नळाचे पाणी खेचले जात असल्यामुळे पाण्याची चणचण अधिकच वाढली आहे. मशीनने पाणी खेचणाऱ्यांच्या घरी मोठी धार, तर प्रामाणिकपणे पाणी भरणाºयांच्या घरी बारीक धारेने पाणीपुरवठा होत राहतो.पोलिसांची मदत घेणारमशीनद्वारे पाणी खेचणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी मजीप्रा अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे ठोस पाऊले उचलली नाही. एक ते दोन घराआड नळाला थेट मशीन लावून पाणी खेचले जात आहे. ही वस्तुस्थिती माहिती असतानाही मजीप्रा ठोस उचलत नाही. हा एकप्रकारे प्रामाणिक ग्राहकांवर अन्यायच आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारी मजीप्रा मशीन लावणाऱ्या ग्राहकांपासून त्रस्त झाली आहे. आधीच मजीप्राकडे मनुष्यबळाचा अभाव आहे. घरोघरी मशीन असल्यामुळे कर्मचारी कुठे-कुठे पाठविणार, अशी स्थिती मजीप्राची झाली आहे. कारवाई करण्यासाठी गेलेल्या मजीप्रा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नागरिक रोष व्यक्त करतात. त्यामुळे आता मजीप्रा पोलीस मदत घेऊन मशीन लावणाऱ्या ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगारणार आहे.सदनिकांमध्ये सर्वाधिक प्रकारशहर विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असताना, फ्लॅटमध्ये राहणे दिवसेंदिवस पसंत केले जात आहे. त्यामुळे शहरातील कानाकोपºयात आता फ्लॅट बनले आहेत. या ठिकाणीही मजीप्राद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, फ्लॅटमध्ये राहणारे रहिवासी पाणी वर चढत नसल्याने थेट मजीप्राच्या नळालाच इलेक्ट्रिक मशीन लावून पाणी खेचण्याचा प्रकार सर्रास करतात. त्यामुळे खालच्या भागात राहणाºयांना योग्य व पुरेसा पाणीपुरवठा होत नाही.मजीप्रा करते हवेचेही बिल वसूल!एक दिवसाआड पाणीपुरवठा व टिल्लू मशीनद्वारे पाणी खेचले जात असल्यामुळे ग्राहकांना सुरळीत पाणी मिळत नाही. त्यातच पाणीपुरवठा सुरू होण्यापूर्वी १० ते १५ मिनिटे हवा पास होत राहते. त्यावेळी मीटरचे रीडिंग सुरूच असते. गेल्या कित्येक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे.पाणीपुरवठा करणाऱ्या नळांना मशीन लावून पाणी खेचले जात असल्यामुळे पाणी पुरवठा नियोजन बिघडले आहे. फ्लॅट सिस्टीममध्ये तर हे प्रकार अधिकच वाढले आहेत. याविषयी वरिष्ठांशी चर्चा करून कारवाईची दिशा ठरविण्यात येईल.- किशोर रघुवंशी, उपविभागीय अभियंता