तंटामुक्ती अध्यक्ष निवडीसाठीच तंटा

By Admin | Updated: October 16, 2015 00:37 IST2015-10-16T00:37:26+5:302015-10-16T00:37:26+5:30

गावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी असलेल्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाचा वाद चांगलाच शिगेला पोहचला आहे.

Tantamukti elected for the selection of the president | तंटामुक्ती अध्यक्ष निवडीसाठीच तंटा

तंटामुक्ती अध्यक्ष निवडीसाठीच तंटा


पोलिसांना पाचारण : कांडलीत गोंधळात गोंधळ अन् शांताबाई
परतवाडा : गावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी असलेल्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाचा वाद चांगलाच शिगेला पोहचला आहे. पुन्हा दुसऱ्यांदा नजीकच्या कांडली येथील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदासाठी बोलाविण्यात आलेली सोमवारची विशेष सभा रद्द झाली.
परतवाडा शहराला लागून असलेल्या कांडली ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्तीची सभा महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ आॅक्टोबर रोजी बोलविण्यात आली होती. मात्र कोरमअभावी ही सभा रद्द ठरली. त्यानंतर १२ आॅक्टोबर रोजी सभा ठेवण्यात आली होती. राजू म्हाला यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या या सभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाकरिता विधानसभा अध्यक्ष गेंदूजी गावंडे बंटी केजडीवाल व जयकुमार चर्जन यांनी आपल्या आपल्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. यावेळी सरपंचा सुषमा थोरात व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. दोन्ही उमेदवारांचे समर्थक सुध्दा मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर तिन्ही उमेदवारांचे समर्थक सुध्दा मोठ्या संख्येने उपस्थित होते. तीनही उमेदवारांचे समर्थकसुध्दा मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेचे कामकाज सुरु होताच समर्थकांनी आपला उमेदवार अध्यक्षपदावर नियुक्त व्हावा यासाठी चांगलाच गोंधळ घातला. सभेचे कामकाज तंटामुक्तऐवजी तंटायुक्त अध्यक्षाची तर निवड होत नाही ना, असा प्रश्न उपस्थितांना पडला आहे. परिणामी पोलिसांना पाचारण करून दुसरीही सभा गुंडाळण्यात आली. तर तिन्ही उमेदवारांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत.
गावात तंटे उदभवू नयेत, शांतता नांदावी, गावातील तंटे गावातच सोडविता यावेत, यासाठी तंटामुक्ती समितीची स्थापना करण्यात येते. परंतु या सभेच्या अध्यक्ष निवडीवरूनच कांडलीत उडालेला गोंधळ पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला होता. या सभेतील गोंधळाची नागरिक ठिकठिकाणी चर्चा करीत होते. (प्रतिनिधी)
महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष हा नि:पक्षपाती असावा, त्यांच्यावर कुठलेच गुन्हे नसावे, सर्वसामान्य नागरिकांना आपला वाटणारा असावा. हा वाद शमवून अध्यक्षपदाची निवड ही नियमाने व्हावी आणि सर्वांनी त्यासाठी सहकार्य करावे.
- सुषमा भारत थोरात,
सरपंच, कांडली.
अध्यक्षपदासाठी वाद
तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी सभा सुरू असताना सभेच्या अध्यक्षपदावरुनच वाद झाला. विद्यमान अध्यक्ष गटाकडून माजी सभापती ओम घोरे यांचे नाव पुढे आले. मात्र त्याला विरोध झाला, तर चर्जन गटाकडून सरपंच सुषमा थोरात यांचे पती भारत थोरात यांचे नाव आले. परंतु त्यांनी माघार घेत राजू म्हाला यांच्या नावाला पसंती दर्शविली. एकंदर तंटामुक्तीच्या अध्यक्षपदाचा वाद आणि त्यासाठी बोलविण्यात आलेल्या सभेचा वाद पाहता सभा कशाची आहे आणि सुशिक्षित नागरिकसुध्दा कसे वागतात, याचा प्रत्यय येत होता.

गोंधळात गोंधळ अन् शांताबाई
कांडली ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी गेंदूजी गावंडे अनेक वर्षांपासून आहेत. मात्र त्यांच्याविरुध्द काही नागरिकांनी नियमानुसार आक्षेप घेतल्याने दुसऱ्या अध्यक्ष निवडीसाठी सभा बोलविण्यात आली होती. त्यामध्ये कांडली गावाबाहेरील काही लोकांनी ग्रामसभेत हजेरी लावून समर्थनार्थ नारेबाजी करीत ‘शांताबाई’ गाणे मोबाईलवर वाजवित नाच सुरु केला. त्यामुळे सभा रद्द करण्यात आली. पोलिसांना पाचारण केल्यावर तंटामुक्ती अध्यक्षपदाचा वाद शमला तर दुसरीकडे गावंडे गुरुजी समर्थकांनी अध्यक्ष बदलवून राजकारण व आर्थिक हित जोपासण्यासाठी खटाटोप असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Tantamukti elected for the selection of the president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.