तंटामुक्त गावांना मिळणार ४६ कोटी
By Admin | Updated: September 20, 2014 23:42 IST2014-09-20T23:42:32+5:302014-09-20T23:42:32+5:30
सन २०१२-१३ मध्ये राज्यातील १७४१ गावे तंटामुक्त जाहीर करून या गावांना ४६ कोटी ५९ लाख ७५ हजार रूपये बक्षिसांची रक्कम मंजूर करण्यात आली. यात अमरावती जिल्ह्यातील ९६ तंटामुक्त गावांना

तंटामुक्त गावांना मिळणार ४६ कोटी
सुरेश सवळे - चांदूरबाजार
सन २०१२-१३ मध्ये राज्यातील १७४१ गावे तंटामुक्त जाहीर करून या गावांना ४६ कोटी ५९ लाख ७५ हजार रूपये बक्षिसांची रक्कम मंजूर करण्यात आली. यात अमरावती जिल्ह्यातील ९६ तंटामुक्त गावांना २ कोटी ४९ लाख रूपये मंजूर झाले आहे. ही पुरस्काराची रक्कम मंजूर केल्याने भविष्यात तंटामुक्त गाव मोहिमेला अधिक गती मिळणार आहे.
गावात तंटे होऊ नयेत म्हणून तसेच दाखल झालेले तंटे व नव्याने निर्माण होणारे तंटे लोकसहभागातून मिळविण्यासाठी व्यवस्था निर्माण व्हावी या दृष्टीने १५ आॅगस्ट २००७ पासून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने भविष्यात तंटे निर्माण होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे, दाखल केलेल्या दिवाणी, महसुली व इतर तंट्याची माहिती संकलित करुन ते लोकसहभागातून सामोपचाराने मिटविले जातात. सन २०१२-१३ मध्ये गाव पुरस्कारासाठी गावांची यादी शासनाच्या गृह विभागाने नुकतीच जाहीर केली. यामध्ये तंटामुक्त गावे व त्यांना मिळणारी बक्षिसांची रक्कम मंजूर करण्यात आली.
यात राज्यातील सर्वाधिक २४६ गावे बुलडाणा जिल्ह्यात तंटामुक्त झाली. या गावांना ७ कोटी ५९ लाख ७५ हजार रुपये बक्षीस स्वरुपात मिळणार आहेत. त्याखालोखाल हिंगोलीतील १४८ तंटामुक्त गावांना ३ कोटी ८३ लाख ५० हजार तर नाशिक ग्रामीणमधील १३४ तंटामुक्त गावांना ३ कोटी १९ लाख मंजूर करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे परभणीतील ४५ गावांना १ कोटी २९ लाख ५० हजार, नांदेड- १ गाव ३ लाख, उस्मानाबाद- २९ गावांना ७९ लाख ७५ हजार, बीड- ९ गावांना २५ लाख, जालना- ८५ गावांना १ कोटी ९६ लाख ५० हजार, औरंगाबाद ग्रामीण ६४ गावांना १ कोटी ५९ लाख, अकोला ४९ गावांना ९० लाख रूपये, वाशीम ३४ गावांना ६१ लाख, यवतमाळ १२९ गावांना ३ कोटी १५ लाख ७५ हजार, नागपूर ग्रामीण ९० गावांना २ कोटी १७ लाख ५० हजार, भंडारा १३ गावांना २६ लाख रूपये, चंद्रपूर १०५ गावांना २ कोटी ५६ लाख ७५ हजार, गडचिरोली ४१ गावांना ८५ लाख रूपये, वर्धा ६ गावांना २१ लाख रूपये, नंदूरबार १५ गावांना ४२ लाख रूपये, धुळे जिल्ह्यातील ३२ गावांना १ कोटी २ लाख रूपये, जळगाव ७१ गावांना १ कोटी ७० लाख, अहमदनगर ४७ गावांना १ कोटी २८ लाख ५० हजार, सोलापूर ग्रामीण ५६ गावांना २ कोटी ९ लाख, सांगली १ गावाला ७ लाख रूपये, सातारा १५ गावांना ४६ लाख, कोल्हापूर ५३ गावांना २ कोटी ११ लाख २५ हजार, पूणे ग्रामीण २६ गावांना ९५ लाख रूपये, सिंधुदुर्ग २१ गावांना ६७ लाख रूपये, रत्नागिरी जिल्ह्यातील १३ तंटामुक्त गावांना २४ लाख रूपये, रायगड जिल्ह्यातील ८ गावांना ३० लाख रूपये, ठाणे ग्रामीण मधील ५९ तंटामुक्त गावांना १ कोटी ५६ लाख रूपये अशा ३३ जिल्ह्यातील १७४१ तंटामुक्त गावांना महात्मागांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत तंटामुक्त गाव पुरस्कारासाठी ४६ कोटी ५९ लाख ७५ हजार रुपयांस मान्यता देण्यात आली असून येत्या काही दिवसांत संबंधित जिल्ह्यांतील पुरस्कारप्राप्त गावांना पुरस्काराच्या रकमेचे धनादेश संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांमार्फत गावनिहाय वितरित करण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील गावांना २ कोटी ४९ लाख रुपयांचे वाटप होेणार आहे.