कार अपघातात तलाठ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:12 IST2021-03-20T04:12:40+5:302021-03-20T04:12:40+5:30
झाडाला धडक : मोर्शी ते चांदूर बाजार मार्गावरील अपघात मोर्शी : भरधाव कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात कारचालकाचा घटनास्थळीच ...

कार अपघातात तलाठ्याचा मृत्यू
झाडाला धडक : मोर्शी ते चांदूर बाजार मार्गावरील अपघात
मोर्शी : भरधाव कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात कारचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मोर्शी-चांदूर बाजार मार्गावर शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास हा अपघात घडला. मुन्ना ऊर्फ नरेश अण्णाजी इंगळे (५५, रा. मोर्शी) असे मृत तलाठ्याचे नाव आहे. ते मोर्शी तहसील अंतर्गत उतखेड येथे कार्यरत होते.
एमएच २७ बीयू ०९६३ क्रमांकाच्या स्वमालकीच्या कारने नरेश इंगळे हे उतखेड येथे कार्यालयीन कामाकरिता जात असताना मोर्शी-चांदूर बाजार मार्गावर वाहनावरील नियंत्रण सुटले. कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला जाऊन धडकल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांना तात्काळ मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघाताचे वृत्त समजताच तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मोर्शी तालुक्याच्या दौऱ्यावर असलेले जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीदेखील उपजिल्हा रुग्णालय गाठून इंगळे कुटुंबीयांचे सांत्वन केले.