अंजनगाव बारीत विद्यार्थी साकारताहेत श्रमदानातून तलाव

By Admin | Updated: May 30, 2016 00:29 IST2016-05-30T00:29:06+5:302016-05-30T00:29:06+5:30

दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी बडनेरा येथील कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने अंजनगाव बारीत तलाव प्रकल्प निर्मितीस प्रांरभ केला.

Taking the work from Anjangaon Bariat students | अंजनगाव बारीत विद्यार्थी साकारताहेत श्रमदानातून तलाव

अंजनगाव बारीत विद्यार्थी साकारताहेत श्रमदानातून तलाव

गावकऱ्यांचीही मदत : ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानातून प्रेरणा
अमरावती : दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी बडनेरा येथील कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने अंजनगाव बारीत तलाव प्रकल्प निर्मितीस प्रांरभ केला. 'लोकमत'ने सुरू केलेल्या जलमित्र अभियानातून प्रेरणा घेत हा उपक्रम राबविण्यात आला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या या महाविद्यालयातील रासेयो कार्यक्रम अधिकारी संतोष बनसोड यांनी अंजनगाव बारीतील ५२ एकर परीक्षेत्राची पाहणी केली. त्यामध्ये कोंडेश्वरजवळील पहाडावरून उतरणारे पाणी अडविता येऊ शकते, असे त्यांच्या लक्षात आले. अखिल भारतीय जैन संघटनेचे उपाध्यक्ष सुदर्शन गांग व समाजसेवक प्रदीप जैन यांनी संतोष बनसोड यांना प्रोत्साहित केले.

गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अमरावती : त्यानुसार त्यांनी महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रकल्पस्थळ निश्चीत करून पाणी अडवा, पाणी जिरवा, उपक्रमास सुरुवात केली. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी अंजनगावात जनजागृती करून गावकऱ्यांना संघटीत केले. त्यानंतर जोमाने या प्रकल्पास सुरुवात करण्यात आली.
यामध्ये संरपंच मंदा कडबे, उपसंरपंच लक्ष्मण कदम, पोलीस पाटील तेटू ताई, दिनेश शिरसागर, संतोष इंगळे, रोषन पुनिया, रवि बान्ते, विक्रम पिसे आदिनी हे कार्य सुरु केले.
या प्रकल्पाचा पायाभरणा अमरावती विद्यापीठाचे समन्वयक गणेश माल्टे यांनी केला, यावेळी माजी समन्वयक श्रीकांत पाटील, ओ.बी.मुंदे, प्राचार्य गोपाल वैराळे यांची उपस्थिती होती. या प्रल्कपासाठी कला महाविद्यालयातील तब्बल १५० विद्यार्थी व ५० माजी विद्यार्थी व शेकडो गावकऱ्यांनी संयुक्तरित्या श्रमदानाला सुरुवात केली.
पहाडावरून साठवण केलेले हे पाणी शेतीसाठी उपयोगी ठरणारे असून जनावरांसाठीसुध्दा सोयीचे होणार आहे. त्याच प्रमाणे मोठ्या प्रमाणात जलसंवर्धन होणार आहे. या प्रकल्पास नरेंद्र मोटवाणी, सांकेत ठाकूर, उमेश गिलोरकर, मंगेश कळसकर व अंजनगाव बारीजवळील गावातील नागरिक भेटी सुध्दा देत आहे.

Web Title: Taking the work from Anjangaon Bariat students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.