‘टेकआॅफ’ पुन्हा रखडणार
By Admin | Updated: March 20, 2015 00:17 IST2015-03-20T00:17:33+5:302015-03-20T00:17:33+5:30
जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण, सौंदर्यीकरण,

‘टेकआॅफ’ पुन्हा रखडणार
अमरावती : जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण, सौंदर्यीकरण, विकास कामांना आवश्यक असलेल्या निशासनाने धीची राज्य बुधवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोेठेही मोहोर उमटविली नाही. शिर्डी, कराड, बेलोरा आदी विमानतळांच्या विकासासाठी केवळ ९१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या तरतुदीमधून बेलोरा विमानतळाला केवळ १७ ते १८ कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात बेलोरा विमानतळ विकासासाठी भरीव निधी मिळेल, ही आशा फोल ठरली आहे.
अमरावती हे विभागीय आयुक्तालयाचे स्थळ असताना येथे विमानतळाची सुविधा नसल्याने बाहेरील उद्योजक किंवा नामांकित व्यक्तींना ये-जा करण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतात. सुविधायुक्त विमानतळ असावे, यासाठी बेलोरा येथे धावपट्टी निर्माण करण्यात आली आहे. या धावपट्टीचे विमानतळात रुपांतर करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे.