वाळू तस्करांवर कडक कारवाई करा
By Admin | Updated: January 3, 2015 22:54 IST2015-01-03T22:54:23+5:302015-01-03T22:54:23+5:30
चिखलदरा व अचलपूर उपविभागीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत परतवाड्याच्या शासकीय विश्राम गृहात शनिवारी पार पडली.

वाळू तस्करांवर कडक कारवाई करा
अचलपूर : चिखलदरा व अचलपूर उपविभागीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत परतवाड्याच्या शासकीय विश्राम गृहात शनिवारी पार पडली. धारणी, चिखलदरा, अचलपूर, चांदूरबाजार तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांचे म्हणने पालकमंत्र्यांनी ऐेकून घेतले. काही अडचणी आल्यास आपल्याशी थेट संपर्क करण्याचे सुचविले. सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याच प्रकारचा त्रास न देता जनहितार्थ कामे मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. ट्रॅक्टर सडेपर्यंत कारवाई
परिसरात गौण खनिजाची चोरी होत असेल तर आता चोरट्यांना धडा शिकविण्यासाठी कडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. रेती तस्करांवर कारवाई दरम्यान पोलीसांची मदत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे नंतर दुसरीकडे महसूल यंत्रणेजवळ वेगळे अधिकारी नसल्यामुळे आहे त्या अधिकाऱ्यांकडूनच कारवाई करण्याचे पालकमंत्री पोटे यांनी सांगितले.
नागरिकांच्या हिताचे काम करताना अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याच्या तक्रारी आहेत. पं.स. अधिकाऱ्यांबाबत या तक्रारी असून त्यांनी आता नागरिकांच्या कामासाठी मुख्यालयी हजर राहण्याचे आदेश दिले. यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र सोमवंशी, नगरसेवक अरुण तायडे, रुपेश चौबे, शैलेंद्र पाल यांनी पालकमंत्री प्रवीण पोटेंची भेट घेतली.