नोकरदारांच्या शिकवणी वर्गांवर कारवाई करा
By Admin | Updated: July 21, 2016 00:07 IST2016-07-21T00:07:50+5:302016-07-21T00:07:50+5:30
नोकरदारांचे शिकवणी वर्ग त्वरीत बंद करा व त्यांच्यावर धाडी टाकून कारवाई करण्यात यावी, ....

नोकरदारांच्या शिकवणी वर्गांवर कारवाई करा
टिचर्स असोसिएशन आक्रमक : शिक्षणाधिकाऱ्यांना दिले निवेदन
अमरावती : नोकरदारांचे शिकवणी वर्ग त्वरीत बंद करा व त्यांच्यावर धाडी टाकून कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी प्रोफेशनल टिचर्स असोसिएशने माध्यमिक शिक्षणाधिकारी सी. आर. राठोड यांना निवेदन दिले. तासभार चाललेल्या चर्चेत टिचर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.
शिक्षण विभागाचा शासन निर्णयानुसार सेवेत असणाऱ्या शिक्षकांनी शिकवणी वर्ग घेऊ नये, तरीही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध शिकवणी वर्ग फोफावले आहे. प्रोफशनल टिचर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष बंडोपंत भुयार यांनी अनेक मुद्दे शिक्षणाधिकाऱ्यांकडे उपस्थित केले आहे. यात संस्था चालकांनी सर्व शिक्षकांकडून नियमबाह्य खाजगी शिकवणी वर्ग घेत नसल्याचे हमीपत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी भरुन घ्यावे, शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये खासगी शिकवणीबाबतच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी एक वेगळा कक्ष निर्माण करुन ही जबाबदारी उपशिक्षणाधिकाऱ्यांवर द्यावी, कक्ष उघडल्याबाबतची प्रसिध्दी वर्तमानपत्रात द्यावी, नियमबाह्य शिकवणी वर्गाबाबत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष येणाऱ्या तक्रारीची दखल घेऊन चौकशी करावी, चौकशीमध्ये दोषी आढळल्यास शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्था चालकांवर योग्य त्या कारवाईच्या सूचना द्याव्यात, जिल्हा स्तरावर शिक्षण उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली समन्वयक समिती स्थापन करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी राज्याध्यक्ष बंडोपंत भुयार, सुनील मानकर, संदीप बुरंगे, अमर गेडाम, नरेंद्र काकणे, ज्ञानेश्वर हिरुळकर, स्वप्नील देशमुख, शशीकांत इखे आदी उपस्थित होते.
अवैध शिकवणी वर्ग राजरोसपणे सुरुच
जिल्ह्यात राजरोसपणे अवैध शिकवणी वर्ग सुरुच आहे. या अवैध शिकवणी वर्गांना रोखण्यासाठी शिक्षण विभागाने कुठल्याही उपाययोजना केल्या नाही. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार शिक्षकांच्या अवैध शिकवणी वर्गांवर रोष वाढला आहे. हजारो रुपये महिन्याकाठी वेतन व शिकवणीचे येत आहेत.
शिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासन
जर कुणी अवैध शिकवणी वर्ग घेत असले तर दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल. असे आश्वासन माध्यमिक शिक्षणाधिकारी सी. आर. राठोड, यांनी बेरोजगार शिक्षकांना दिले.