पदवीधर नोंदणीतील दोषींवर कारवाई करा
By Admin | Updated: May 31, 2016 00:13 IST2016-05-31T00:13:10+5:302016-05-31T00:13:10+5:30
वर्षाअखेरीस होई घातलेल्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य...

पदवीधर नोंदणीतील दोषींवर कारवाई करा
निवेदन : युवक काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
अमरावती : वर्षाअखेरीस होई घातलेल्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान जिल्हा व्यवस्थापकांच्या कार्यालयातून मतदार नोंदणी होत असल्याचा भंडाफोड युवक काँग्रेसने शुक्रवारी उघडकीस आणला आहे. मात्र त्यानंतर याप्रकरणी अद्यापही ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे सोमवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना युवक काँग्रेसच्यावतीने निवेदन देऊन याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
२७ मे रोजी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कुकडे यांच्या टेबलवर आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पदवीधर मतदारांच्या नोंदणीचे फॉर्म वाटप केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. त्यामुळे याप्रकरणी दोषींवर तीन दिवस होऊन कु ठली कारवाई केली नाही. याची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. हा गंभीर प्रकार उघडकीस आणल्यानंतर दोषीवर कारवाईचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले होते. मात्र या प्रकरणात दोषी असलेल्या जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कुकडे, व डी.एच.ओ. यांच्यावरही ठोस कारवाईची मागणी केली आहे. यावेळी भय्या पवार, आदित्य पेलागडे, सागर देशमुख,गुड्डू धर्माळे गुडू हमिद, आनंद देशमुख, अमोल देशमुख, परहान पठाण, गाझी जहरोश, सागर यादव, आशिष यादव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)