अमरावती : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासकीय अधिकाºयांच्या वाहनांवरील अंबर दिवे काढण्याची कारवाई झाली असली तरी जिल्ह्यातील बहुतांश तहसीलदार, उपविभागीय अधिकाºयांनी त्यांच्या वाहनांवर निळे दिवे अद्यापही लावले नाहीत. सध्यातरी हे अधिकारी वाहनांवर कोणताही दिवा न लावताच कर्तव्य बजावत आहेत. वाहनांवरील अंबर दिवे काढण्याबाबतचे शासनाचे आदेश धडकताच राज्य परिवहन विभागाने या आदेशाची अंमलबजावणी करायला सुरवात केली. पोलीस आयुक्त, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक आदींनी वाहनांवरील अंबर दिवे काढून त्याऐवजी निळे दिवे लावले. त्यापाठोपाठ महसूल विभागाच्या अधिकाºयांनीही वाहनांवरील अंबर दिवे काढले. मात्र, तहसीलदार, एसडीओंनी अंबर दिवे काढल्यानंतर वाहनांवर निळे दिवे लावण्यास नकार दिला. अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी येथील महसूल विभागाचे अधिकारी विना दिव्यांच्या वाहनांनी फिरत आहेत. या अधिकाºयांना निळ्या दिव्यांची ‘अॅलर्जी’ असल्याची चर्चा आहे.
तहसीलदार,एसडीओंना निळ्या दिव्याची ‘अॅलर्जी’
By admin | Updated: May 5, 2014 00:19 IST