अपंग शालिकरामची तहसीलदाराने घेतली दखल
By Admin | Updated: September 7, 2015 00:34 IST2015-09-07T00:34:07+5:302015-09-07T00:34:07+5:30
कोव्हळा जटेश्वर येथील वयोवृद्ध अपंग शालीकराम आत्माराम साखरकर (६५) यांच्या छोट्याशा झोपडीला नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार बी.व्ही. वाहूरवाघ यांनी भेट देऊन शासकीय मदतीचे आश्वासन त्यांनी दिले.

अपंग शालिकरामची तहसीलदाराने घेतली दखल
मदतीचे आश्वासन : भेटीमुळे गावकरी गहिवरले
वाढोणा रामनाथ : कोव्हळा जटेश्वर येथील वयोवृद्ध अपंग शालीकराम आत्माराम साखरकर (६५) यांच्या छोट्याशा झोपडीला नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार बी.व्ही. वाहूरवाघ यांनी भेट देऊन शासकीय मदतीचे आश्वासन त्यांनी दिले.
२ सप्टेंबर रोजी ‘लोकमत’ने ‘अपंग वृद्धाच्या नशिबी वनवास’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यांची दखल तहसीलदार बी.व्ही. वाहूरवाघ यांनी घेतली. स्वत: त्यांनी अपंग शालीकरामच्या बाजूला बसून त्यांनी काळजीपूर्वक विचारपूस केली. सोबत आणलेले फळे शालीकरामला दिले, असे शालीकरामला जाणवत होते. मायेचा ओलावा आणि जिव्हाळ्याची विचारपूस वाहूरवाघ यांनी केली. तेव्हा गावकरीही भावूक झाले होते.
अपंग शालीकरामला अन्न, वस्त्र, निवारा देण्याचे आदेश तात्काळ संबंधिताना दिले. झोपडीचे रूपांतर घरकुलात करण्यासाठी लवकरच संबंधित विभागाशी संपर्क साधून घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन तहसीलदार वाहूरवाघ यांनी यावेळी दिले. (प्रतिनिधी)