शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
7
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
8
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
9
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
10
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
11
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
12
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
13
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
14
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
15
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
16
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
17
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
18
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
19
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
20
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी

ताहेरा बानोच्या हत्याकांडात परिचित संशयाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:46 PM

हजरतबिलालनगरातील ताहेरा बानो हत्याकांडात परिचित व्यक्ती संशयाच्या भोवºयात असून, पोलिसांनी पाच संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सर्व बाजू तपासल्यानंतरही हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नाही.

ठळक मुद्देपाच संशयितांची चौकशी : पोलिसांना अद्याप यश नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हजरतबिलालनगरातील ताहेरा बानो हत्याकांडात परिचित व्यक्ती संशयाच्या भोवºयात असून, पोलिसांनी पाच संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सर्व बाजू तपासल्यानंतरही हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नाही.ताहेबा बानो यांच्या हत्येविषयी माहिती काढण्यासाठी पोलिसांची विविध पथके तपासकामी लागले असून, त्यांच्या विभिन्न मतामुळे ताहेबा बानो यांची हत्या नेमकी कोणी केली, या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचू शकले नाहीत, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर पोलीस सांगत आहे. ताहेरा बानो यांची गळा आवळून व तोंड दाबून हत्या झाल्याचे प्राथमिक वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट झाले. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध जबरी चोरी, लूटपाट व हत्येचा गुन्हा नोंदविला.पोलीस उपायुक्त यशवंत सोळंखे यांच्या नेतृत्वात गाडगेनगर, गुन्हे शाखा व सायबर पोलीस तपासाची सूत्रे हलवित आहे. पोलिसांनी ताहेबा बानो यांचा अमरावतीतील जावई, घरकाम करणाऱ्या नुसरत परवीन, दुधवाला, कंट्रोलमध्ये काम करणारा तरुणासह अन्य दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी चौकशी केली.सोमवारी सकाळी पुन्हा संशयितांची चौकशी झाली. मात्र, कोणताही उलगडा होऊ शकला नाही. पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले असताना पोलिसांकडून अद्याप हत्येचा उलगडा झालेला नाही.सीसीटीव्ही बंद केले कुणी?ताहेरा बानो यांच्या घराच्या चौफेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. मात्र, शनिवारी रात्री ९ वाजता सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाले आहे. रविवारी दुपारी ३ वाजता पोलिसांनी सीसीटीव्ही पुन्हा सुरू केले. ताहेरा बानो व त्यांचे पती अकील अहमद सीसीटीव्ही हे दोघेच घरात असताना सीसीटीव्ही कुणी बंद केला असावा, या निष्कर्षाप्रत पोलिसांचे तपासकार्य पोहचले आहे.बांधकामस्थळी प्रात्यक्षिकताहेबा बानो यांच्या घराशेजारीच एका तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्या बांधकामस्थळी शेकडो मजूर काम करीत आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी बांधकाम करणाºया मजुरांची चौकशी केली. हत्येनंतर तेथील एक व्यक्ती मयतीला किंवा तेथे भेटीलासुद्धा आला नव्हता. तो व्यक्ती गायब असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहे. बांधकामस्थळाहून ताहेबा बानो यांच्या घरात शिरण्याचा सोपा मार्ग असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे बांधकाम स्थळावरील तो व्यक्ती ताहेरा बानोच्या घरात शिरला असावा, असा संशय पोलिसांनी वर्तविला आहे. त्यासाठी पोलिसांनी बांधकाम स्थळावरून ताहेबा बानोंच्या घरात शिरण्यासाठी प्रात्यक्षिक केले.सीडीआर तपासणीपोलिसांनी संशयित आरोपींची कसून चौकशी केली. त्यांच्या मोबाईल क्रमांकावरून सीडीआरची तपासणीसुद्ध पोलीस करीत आहेत. घटनेवेळी संशयित आरोपी कुठे होते? त्यांनी कोणाशी संपर्क केला, या बारीकसारीक बाबींची चौकशी पोलीस करीत आहेत.मृताच्या परिचयातील पाच संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सर्व बारीकसारीक बाबी तपासून पाहिल्या जात आहे. लवकरच हत्येचा उलगडा होईल.- यशवंत सोळंखे,पोलीस उपायुक्त