अचलपूर शहरातील अट्टल गुन्हेगार तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:13 IST2021-05-25T04:13:24+5:302021-05-25T04:13:24+5:30

अचलपूर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यावरून ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी सय्यद जमीर याचा ...

Tadipar hardened criminals in Achalpur city | अचलपूर शहरातील अट्टल गुन्हेगार तडीपार

अचलपूर शहरातील अट्टल गुन्हेगार तडीपार

अचलपूर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यावरून ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी सय्यद जमीर याचा तडीपार प्रस्ताव अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांना सादर केला होता. त्यांनी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांना सादर केला होता. अतिसंवदेनशील अचलपूर परतवाडा शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पाहता अट्टल गुन्हेगार सैयद जमीर सैयद करीम याला सहा महिन्यांकरीता अमरावती जिल्हा व मध्यप्रदेश प्रांतातील बैतुल जिल्ह्याअंतर्गत सीमेलगत असलेल्या तालुक्याच्या हद्दीतून तडीपार घोषित केले.

Web Title: Tadipar hardened criminals in Achalpur city