--------------------------------------------------------
अण्णा भाऊ साठे चौकात जुगार पकडला
अमरावती: वलगाव पोलिसांनी येथील अण्णा भाऊ साठे चौकात कारवाई करून जुगाराच्या साहित्यासह २२५० रुपयाचे साहित्य जप्त केले. ही कारवाई रविवारी करण्यात आली.
या प्रकरणी आरोपी आप्पा नारायण हिवराळे (५०), सुनील नारायण जाधव (४५, दोन्ही रा अण्णा भाऊ साठे चौक वलगाव) याच्याविरुद्ध पोलिसानी गुन्हा नोंदविला आहे. ही कारवाई एपीआय मनीष वाकोडे यांनी केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
---------------------------------------------------------
उपचार दरम्यान इसमाचा मृत्यू
अमरावती: एका इसमाला सारी या आजाराच्या उपचाराकरीता शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार दरम्यान रविवार त्यांचा मृत्यू झाला.
पोलीससूत्रानुसार, शंकर पंजाबराव घोडेस्वार (४५, रा. जुनी वस्ती बडनेरा) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी बडनेरा पोलिसानी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.