तडीपार आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:13 IST2021-03-21T04:13:33+5:302021-03-21T04:13:33+5:30
अमरावती : शहर हद्दीतून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आलेला आरोपी राजापेठ ठाणे हद्दीतील हमालपुऱ्यातील श्रीहरी हॉटेलजवळ आढळून ...

तडीपार आरोपी अटकेत
अमरावती : शहर हद्दीतून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आलेला आरोपी राजापेठ ठाणे हद्दीतील हमालपुऱ्यातील श्रीहरी हॉटेलजवळ आढळून आला. त्याला राजापेठ पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. कपिल रमेश भाटी (२३, रा. अमरावती) याला अटक केली आहे.
---------------------------------------------------
शारदानगरातून धारदार शस्र जप्त
अमरावती : हातात तलवार घेऊन लोकांमध्ये दहशद पसरवित असलेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन तलवार जप्त केली. ही कारवाई राजापेठ ठाणे हद्दीतील शारदानगरातील बगिच्यासमोर शुक्रवारी करण्यात आली. दुर्गेश बापुराव मोरे (२३, रा. रुईकरनगर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी कलम ४,२५ आर्म ॲक्टसह अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविला.
--------------------------------------------
चवरे नगरात जुगार पकडला
अमरावती : राजापेठ पोलिसांनी चवरे नगरात जुगार अड्ड्यावर कारवाई करून जुगाराच्या साहित्यासह ७७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. याप्रकरणी आरोपी संजय इंगळे (४५, रा. फ्रेजरपुरा) व एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला.