रेल्वेगेट अ‍ॅटोमॅटिक चालू-बंद करण्याची प्रणाली साकारली

By Admin | Updated: July 25, 2016 00:20 IST2016-07-25T00:20:29+5:302016-07-25T00:20:29+5:30

अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानवविरहित मॉक्रोकन्ट्रोलर बेस अ‍ॅटोेमॅटिक रेल्वे गेट कंट्रोल सिस्टिमचे संशोधन केले.

The system of railwaygate automatic shutdown has been created | रेल्वेगेट अ‍ॅटोमॅटिक चालू-बंद करण्याची प्रणाली साकारली

रेल्वेगेट अ‍ॅटोमॅटिक चालू-बंद करण्याची प्रणाली साकारली

विद्यार्थ्यांचे संशोधन : वेळ वाचविण्यास, अपघात टाळण्यास उपयुक्त
अमरावती : अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानवविरहित मॉक्रोकन्ट्रोलर बेस अ‍ॅटोेमॅटिक रेल्वे गेट कंट्रोल सिस्टिमचे संशोधन केले. डॉ.राजेंद्र गोडे इंस्टिट्यूट आॅफ टेक्नालॉजी अ‍ॅन्ड रिसर्च येथील विद्यार्थ्यांनी ही संकल्पना साकारली.
भारतीय रेल्वेमध्ये मानवचलीत रेल्वे गेट उघडणे व बंद करण्याची व्यवस्था आहे. रेल्वे येण्याच्या काही वेळाआधीच रेल्वे गेट बंद केले जाते. मात्र, आजच्या वेगवान युगात प्रत्येक व्यक्तीला ठरावीक वेळात पोहोचण्याची घाई असते. अशावेळीच रेल्वे गेट काही वेळापूर्वी बंद केले जाते आणि उशिरा उघडले जाते. यामुळे सर्वसामान्यांना नाहकच त्रास सहन करावा लागतो. त्यातच गेट बंद असताना अनेक जण फाटकाखालून वाहने काढतानाही आढळून येतात. अशाप्रसंगी एखाद्या अपघात घडण्याचीसुध्दा दाट शक्यता असते. या बाबींवर मात करण्यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी शक्कल लढविली आहे. संगणकशास्त्र विभागाच्या अंतिम वर्षांच्या करिष्मा शिरसाट, पूजा म्हात्रे, दीपा पावसे, सदाफ अन्सारी यांनी विभागप्रमुख हेमंत आर. देशमुख यांच्या मार्गदर्शनात मानवरहित मॉक्रोकन्ट्रोलर बेस आॅटोमॅटीक रेल्वे गेट कन्ट्रोल सिस्टीम साकारली. या संशोधनामुळे भारतीय रेल्वेचा मोठा प्रमाणात खर्च कमी होण्यास मदत मिळू शकत असल्याचे मत विद्यार्थ्यांचे आहे. तसेच रेल्वेच्या कामात गती व अचुकता आणता येणार असून त्याद्वारे अपघाताचे प्रमाण रोखण्यास मदत मिळू शकेल. विद्यार्थ्यांच्या या कार्याचे संस्थाध्यक्ष योगेद्र गोडे, संचालक व्ही.टी.इंगोले, प्राचार्य एस.जी. पाटील, आर.एम. देशमुख, एच.आर. देशमुख, एस.एस. दांडगे, एम.पी. पचगाडे, एस.ऐ. देशमुख, अभिजित शहाडे यांनी कौतुक केले. (प्रतिनिधी)

प्रणालीचा होणार असा उपयोग
मानवरहित मॉक्रोकन्ट्रोलर बेस अ‍ॅटोमॅटिक रेल्वे गेट कंट्रोल सिस्टिममध्ये इंफ्रारेड सेन्संर आणि प्रेशर सेन्सर प्रणालीचा उपयोग करण्यात आला आहे. प्रेशर सेन्सर हे रेल्वे गेटपासून ठरावीक अंतरावर रेल्वे रुळावर लावले जाईल. या सेन्सरमध्ये रेल्वेच्या वजनाची नोंद असून त्या नोंद असलेल्या वजनाइतके वजन त्यावरून गेल्याशिवाय गेट उघडले किंवा बंद होणार नाही. पंरतू ज्यावेळेला त्या सेन्सरवरून रेल्वे जाईल, त्यावेळेस रेल्वे गेट आपोआप बंद होईल. हेसर्व अ‍ॅटोमॅटीक पद्धतीने होणार असल्यामुळे या कामात गती व अचुकता येणार आहे. इंफ्रारेड सेन्सर हे रेल्वे गेट बंद असताना रेल्वे गेटवरील रुळावर अ‍ॅक्टिव्ह राहणार आहेत. त्यावेळेस रुळावर कोणी आल्यास सायरन वाजल्याने अपघात टाळता येईल.

Web Title: The system of railwaygate automatic shutdown has been created

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.