मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

By Admin | Updated: March 26, 2017 00:09 IST2017-03-26T00:09:31+5:302017-03-26T00:09:31+5:30

मंत्रालयात नुकसान भरपाई मागण्यास गेलेल्या एका शेतकऱ्याला मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली.

The symbolic statue of the Chief Minister was burnt | मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

कार्यकर्ते पसार : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन, शेतकऱ्यास मारहाणीचा विरोध
अमरावती : मंत्रालयात नुकसान भरपाई मागण्यास गेलेल्या एका शेतकऱ्याला मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शनिवारी पंचवटी चौकात आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता ते पसार झाले. औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी रामेश्वर भुजाडे यांचे गारपिटीमुळे शेतमालाचे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईची मागणी करण्यासाठी मुंबई येथील मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेला होता. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला बेदम मारहाण केली होती. या घटनेचा निषेध करण्याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अमरावती जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या हुकूमशाही धोरणाचा निषेध केला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे आंदोलकांच्यावतीने दहन करण्यात आले. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याऐवजी सरकार दडपशाही पद्धतीने कारभार करीत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. (प्रतिनिधी)

गुन्हा दाखल
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात येईल, अशी माहिती पीआय कैलास पुंडकर यांनी दिली

Web Title: The symbolic statue of the Chief Minister was burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.