गुलाब पुष्प ठरले हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक

By Admin | Updated: September 22, 2016 00:20 IST2016-09-22T00:20:37+5:302016-09-22T00:20:37+5:30

शहरातील मुस्लिम बांधवांनी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान सामाजिक बांधिलकी जोपासून गणेशभक्तांना गुलाबपुष्प देऊन हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडविले.

The symbol of Hindu-Muslim unity as a rose flower | गुलाब पुष्प ठरले हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक

गुलाब पुष्प ठरले हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक

आदर्श उपक्रम : सामाजिक एकोप्याचे दर्शन
नांदगाव खंडेश्वर : शहरातील मुस्लिम बांधवांनी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान सामाजिक बांधिलकी जोपासून गणेशभक्तांना गुलाबपुष्प देऊन हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडविले. त्यामुळे याप्रसंगी जणूकाही गुलाबपुष्पच हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक ठरल्याचे दिसून आले.
नांदगाव नगरपंचायतीचे आरोग्य सभापती फिरोजखान यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पुढाकार घेवून शहरामध्ये हिंदू-मुस्लिम बांधवांची एकता अबाधित रहावी, यासाठी गणेशभक्तांच्या स्वागतासाठी आगळावेगळा उपक्रम राबविला. शहरातील बारीपुरा येथे गणेश मंडळातील सदस्यांना गुलाब पुष्प देवून मुस्लिम बांधवांनी गणेशभक्तांचे स्वागत केले. यामधून जनसामान्यांमध्ये हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देण्यात आला. असाच सामाजिक सलोखा सदैव कायम रहावा व हिंदू-मुस्लिम एकत्रिकरण अबाधित रहावे, असा सूर गणेशभक्तांच्या चर्चेतून ऐकू येत होता. सामाजिक सलोखा कायम राहण्यासाठी आरोग्य सभापती फिरोज खान यांनी घेतलेल्या पुढाकाराचेही गणेशभक्तांनी कौतुक केले.
यावेळी फिरोज खान यांचेसह पोलीस निरीक्षक अमित वानखडे, तहसीलदार बी.व्ही.वाहुरवाघ, जब्बारअली, देवीदास सुने, मो. गफ्फार, मो. राजीक, मो. नसीम, मो. ताबीरा, मो. दानिश, नावेद खान, मो. तौसिफ, मो. अबरार, शेख नईम, शेख तन्वीर, मो. कलीम, शेख रमीज इत्यादी नागरिक उपस्थित होते. धार्मिकतेच्या मुद्यांवरून एकीकडे काही ठिकाणी वाद निर्माण होतात. तणाव निर्माण होतो. प्रसंगी हाणामारीही होते. अशी स्थिती असताना नांदगाव शहरात मात्र हिंदू-मुस्लिम एकतेचे अनोखे दर्शन पाहायला मिळाले. या उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The symbol of Hindu-Muslim unity as a rose flower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.