गवळीपुऱ्यात तलवार व धारदार सत्तुर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:12 IST2021-04-18T04:12:50+5:302021-04-18T04:12:50+5:30
अमरावती : गवळीपुऱ्यातील मशिदीवजळ दोन गटात भांडण सुरू असल्याची माहिती मिळताच गस्तीवरील पोलील घटनास्थली दाखल झाले. एका इसमाला हातात ...

गवळीपुऱ्यात तलवार व धारदार सत्तुर जप्त
अमरावती : गवळीपुऱ्यातील मशिदीवजळ दोन गटात भांडण सुरू असल्याची माहिती मिळताच गस्तीवरील पोलील घटनास्थली दाखल झाले. एका इसमाला हातात तलावर घेऊन फिरताना ताब्यात घेण्यात आले. त्याच्या घराची झडती घेतली असता, पोलिसांना एक धारदार सत्तुर आढळून आला. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. सय्यद जब्बार शेख रसूल (५२, रा. गवळीपुरा) असे आरोेपीचे नाव आहे.
पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक कैलाश पुंडकर एपीआय जे.एन. सय्यद तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीविरुद्ध नागपुरी गेट ठाण्यात गुन्हा नोंदविला. या कारवाईमुळे रमजान या पवित्र महिन्यात एक मोठा घातपाताचा डाव गुन्हे शाखेने उलथून लावला. आरोपीची कसून चौकशी पोलीस करीत आहेत.