‘स्वाईन फ्लू’चा चोरपावलांनी प्रवेश !

By Admin | Updated: March 29, 2017 00:09 IST2017-03-29T00:09:45+5:302017-03-29T00:09:45+5:30

स्वाईन फ्लू’ने शिरजगाव कसबा येथील एका महिलेचा उपचारादरम्यान नागपूर येथील रूग्णालयात मृत्यू झाला.

'Swine flu' thieves enter! | ‘स्वाईन फ्लू’चा चोरपावलांनी प्रवेश !

‘स्वाईन फ्लू’चा चोरपावलांनी प्रवेश !

शिरजगाव कसबा येथील महिलेचा मृत्यू : दोघा संशयितांचे ‘स्वॅप’ नागपुरला
अमरावती : ‘स्वाईन फ्लू’ने शिरजगाव कसबा येथील एका महिलेचा उपचारादरम्यान नागपूर येथील रूग्णालयात मृत्यू झाला. त्यामहिलेचे अडीच महिन्यांचे बाळ व तिच्या बहिणीचे ‘स्वॅप’ घेण्यात आले असून इर्विनमार्फत नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे. यावरून जिल्ह्यात पुन्हा चोरपावलांनी ‘स्वाईन फ्लू’ या घातक आजाराचा प्रवेश होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
‘स्वाईन इन्फ्लूएन्झा’ किंवा ‘स्वाईन फ्लू’हा इन्फ्लुएन्झा रोगाचा एक प्रकार आहे. हा सामान्यत: वरांहांमध्ये आढळणाऱ्या विषाणुंमुळे होतो. वराहांच्या संपर्कात सातत्याने आल्यास त्या व्यक्तिला या विषाणूची बाधा होऊ शकते.
‘स्वाइन फ्लू’हा एक संसर्गजन्य रोग असून तो एकापासून दुसऱ्यापर्यंत सहजरित्या पसरू शकतो. स्वाईन फ्लूचा संसर्ग वराहांद्वारे तसेच या रोगाने बाधित व्यक्तिच्या संपर्कात आल्यास अन्य व्यक्तिला होऊ शकतो. रूग्णाच्या नाकातील व घशातील स्राव, त्याचा घाम वा त्याची थुंकी यामधून यारोगाचा प्रसार होतो. मागील वर्षी स्वाईन फ्लूचे रूग्ण विविध शहरांमध्ये आढळले होते. काहींचा मृत्युदेखील झाला. जिल्ह्यातही स्वाईन फ्लूचे संशयीत रूग्ण इर्विनमध्ये दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील दोन रूग्णांचा स्वाईन फ्लूमुळे नागपूरला मृत्यू झाल्याची माहिती आहे.

आजार
कसा टाळावा ?
१. हात नेहमी साबणाने धुवावेत. २. गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे. ३. स्वाईन फ्लू रूग्णापासून किमान एक हात तरी लांब राहावे. ४. खोकताना-शिंकताना तोंडाला रूमाल लावावा. ५. भरपूर पाणी प्यावे व पुरेशी झोप घ्यावी. ६. पौष्टिक आहार घ्यावा. ७. हस्तांदोलन करण्याचे अथवा आलिंगन देण्याचे व सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे टाळावे. ८. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे. ९. आजारी असल्यास शक्य तितक्या कमी लोकांशी संपर्क ठेवावा व घरीच विश्रांती घ्यावी. १०. आहारात पातळ पदार्थ मोठ्या प्रमाणात घ्यावेत. ११. तोंडावर मास्क लावावा.

आजाराची लक्षणे
ताप, खोकला, घसा दुखणे, अतिसार, उलट्या आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही या आजाराची लक्षणे आहेत.
टॅमीफ्लू एकमात्र औषधोपचार
टॅमीफ्लू हे औषध एच-१ एन-१ विषाणूच्या संसर्गावर प्रभावी औषधी आहे. याऔषधीचा पुरेसा साठा शासकीय रूग्णालयाला पुरविण्यात येतो. असतो. टॅमीफ्लू गोळ्यांशिवाय, एन ९५, मास्क आणि सर्जिकल मास्क वगैरे वैयक्तिक संरक्षक साधनांचा पुरेसा साठा रूग्णालयात उपलब्ध आहे.

स्वाईन फ्लूचा संशयीत अडीच वर्षीय मुलगा व एक २२ वर्षीय महिलेवर औषधोपचार सुरु करण्यात आले आहेत. या मुलाच्या आईचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याचे नातेवाईक सांगत आहे. दोघांवरही प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती चांगली आहे.
-अरूण राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक, इर्विन रुग्णालय.

Web Title: 'Swine flu' thieves enter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.