धसका स्वाईन फ्लूचा; मोकाट वराह बंदिस्त !

By Admin | Updated: February 13, 2015 00:45 IST2015-02-13T00:45:04+5:302015-02-13T00:45:04+5:30

राज्यात स्वाईन फ्लू या जीवघेणा आजाराने डोके वर काढले आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने उपाययोजना सुरु केल्या आहेत.

Swine flu; Mokat Varah is locked! | धसका स्वाईन फ्लूचा; मोकाट वराह बंदिस्त !

धसका स्वाईन फ्लूचा; मोकाट वराह बंदिस्त !

अमरावती : राज्यात स्वाईन फ्लू या जीवघेणा आजाराने डोके वर काढले आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने उपाययोजना सुरु केल्या आहेत. याच श्रृखंलेत शहरात मोकाट वराह पकडो मोहीम सुरु केली असून पशुपालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.हॉटेल प्रतिष्ठानच्या संचालकांना स्वच्छता बाळगण्यासाठी अवगतही केले आहे.
स्वाईन फ्लू हा इन्फ्लूएन्झा ए (एच१-एन१) चा प्रादुभाव मानवास होऊन साथ उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वाईन फ्लू हा घशाचा आजार असून अति संसर्गजन्य आहे.
घाण असलेल्या ठिकाणाहून अधिक प्रमाणात स्वाईन फ्लू होण्याची शक्यता लक्षात घेता, आयुक्त अरुण डोंगरे यांनी शहरातील मोकाट वराह पकडण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार सहायक पशु वैद्यकीय अधिकारी सचिन बोंद्रे यांच्या नेतृत्वात ही मोहीम सुरु आहे.
स्वाईन फ्लू रोखण्यासाठी हे करा
हात सातत्याने साबण व पाण्याने धुवावेत
गर्दीमध्ये जाणे टाळा
स्वाईन फ्लू संशयित रुगापासून किामान एक हात दूर राहावे
खोकलतांना शिंकताना तोंडाला रुमाल लावावा
भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप घ्यावी, पौष्टिक आहार घ्या
काय आहे इन्फ्लुएंन्झा व्हायरस ?
हा विषाणूमुळे होणारा रोग आहे.
याचा संसर्ग एका मानवापासून दुसऱ्या मानवला होतो.

Web Title: Swine flu; Mokat Varah is locked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.