शेतकऱ्यांच्या हाती शस्त्र देऊन शिवरायांकडून स्वराज्य क्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 22:56 IST2018-12-29T22:56:31+5:302018-12-29T22:56:52+5:30
प्राप्त परिस्थितीला वश न जाता, शेतीचे व मातीचे रक्षण करण्याची प्रेरणा शिवरायांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांना दिली, असे प्रतिपादन शिवव्याख्याते नितीन बानुगुडे यांनी केले.

शेतकऱ्यांच्या हाती शस्त्र देऊन शिवरायांकडून स्वराज्य क्रांती
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्राप्त परिस्थितीला वश न जाता, शेतीचे व मातीचे रक्षण करण्याची प्रेरणा शिवरायांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांना दिली, असे प्रतिपादन शिवव्याख्याते नितीन बानुगुडे यांनी केले.
अमरावती महानगरपालिका, रुक्मिणी सामाजिक विकास बहुउद्देशीय मंडळ व शिव सह्याद्री प्रतिष्ठानद्वारे संत ज्ञानेश्वर संस्कृतिक भवनात आयोजित शिवशाही महोत्सव २०१८ चा समारोपीय सोहळ्यात शुक्रवारी नितीन बानुगुडे यांचे शिवव्याख्यान झाले. परकीयांच्या आक्रमणाने व घोड्यांच्या टापांंनी शेतकºयांची उभी पिके नष्ट केलेली असायची. तेव्हा शेतकरी शिवाजी महाराजांकडे धाव घ्यायचे. महाराज त्यांना म्हणाले, जेव्हा तुमच्या रानात मोत्यासारख्या कणसांचे पाखरं नुकसान करतात, तेव्हा तुम्ही काय करता? आम्ही बांधावर गोफण्या घेऊन उभे राहतो जी, असे उत्तर मिळाले. शिवराय म्हणाले, आताही तेच करा. हा मंत्र घेऊन दगडांच्या माºयाने शेतकºयांनी शत्रूंना पळवून लावले. जे लष्करालाही जमले नाही, ते शिवाजी महाराजांनी शेतकºयांचा हातात शस्त्र देवून जगातील पहिली क्रांती केली. त्याचे नाव होते ‘स्वराज्य’ तीच खºया अर्थाने शेतकºयांची क्रांती होती, असे प्रतिपादन बानुगुडे यांनी केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार बच्चू कडू, जिजाऊ बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे, नगरसेवक विलास इंगोले, दिनेश बूब, महापालिका विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेश वानखडे, भाजपचे प्रणय कुलकर्णी, बाजार समिती उपसभापती नाना नागमोते, सुधीर सूर्यवंशी, किशोर चांगोले, उमेश अर्डक, मनोज भोजणे, धनंजय बंड, विनोद कोरडे, गजानन देशमुख, स्वराज बंड उपस्थित होते. प्रास्ताविक भूषण फरतोडे व संचालन श्रीकृष्ण पखाले यांनी केले.
वसा फांऊडेशनच्या पदाधिकाºयांचे, रॉबीन हुड आर्मी संस्था, अव्दैत बहुउद्देशीय संस्थेसह महिला टीमचेसुद्धा शिवशाही महोत्सवात गौरव करण्यात आला. यावेळी माजी आमदार संजय बंड यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या स्मृत्यर्थ शिवशाही महोत्सव पुढील वर्षापासून आयोजित होईल.
‘नाळ’ टीमचा गौरव
‘नाळ’ या मराठी चित्रपटातील अमरावतीच्या बालकलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. श्रीनिवास पोखळे, मैथाली ठाकरे, संकेत इटनकर यांनी ‘नाळ’मधील डायलॉग सादर करून श्रोत्यांना खिळविले. यावेळी कास्टिंग डायरेक्टर प्रवीण इंदू यांचाही गौरव करण्यात आला.