गुरुकुंजात वनमंत्र्यांचा शपथविधी
By Admin | Updated: June 11, 2017 00:11 IST2017-06-11T00:11:07+5:302017-06-11T00:11:07+5:30
अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळाच्या संचालकीय सदस्यपदी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा शपथविधी सेवाश्रमातील प्रार्थना मंदिरात पार पडला.

गुरुकुंजात वनमंत्र्यांचा शपथविधी
संचालक : अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ
लोकमत न्यूज नेटवर्क
गुरूकुंज (मोझरी) : अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळाच्या संचालकीय सदस्यपदी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा शपथविधी सेवाश्रमातील प्रार्थना मंदिरात पार पडला.
यावेळी अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे, प्रकाश महाराज वाघ, लक्ष्मण गमे, पुष्पा बोंडे, कांताप्रसाद मिश्रा, राजाराम बोथे, रघुनाथ वाडेकर, दामोदर पाटील, विलास साबळे, सूर्यप्रकाश जयस्वाल, जनसेवक जयस्वाल, भानुदास कराळे, संजय देशमुख, दिनेश सूर्यवंशी, निवेदिता दिघडे, महिला मंडळच्या हजारे, गुंफा आगर, ठाकरे, राजश्री जयस्वाल, हांडे या उपस्थित होत्या. संकल्पगीताने सुरवात होऊन जयघोषाने हा शपथविधी सोहळा संपन्न झाला.