‘महफील’च्या ‘ग्रँड’ पार्किंगने रस्ता गिळंकृत
By Admin | Updated: July 18, 2016 01:18 IST2016-07-18T01:18:18+5:302016-07-18T01:18:18+5:30
स्थानिक कॅम्प रोडवरील आलिशान ग्रँड महफीलचे पार्किंगसाठी ‘सरकारी’ रस्त्यांचा राजरोसपणे वापर सुरू केला आहे.

‘महफील’च्या ‘ग्रँड’ पार्किंगने रस्ता गिळंकृत
‘ट्रॅफिक जाम’ने चुकीच्या दिशेने वाहतूक : ‘बड्यां’वर होणार का कारवाई ?
अमरावती : स्थानिक कॅम्प रोडवरील आलिशान ग्रँड महफीलचे पार्किंगसाठी ‘सरकारी’ रस्त्यांचा राजरोसपणे वापर सुरू केला आहे. रविवारी तर ग्रँड महफिलमधी कार्यक्रमात सहभागी झालेले शेकडो वाहने रस्त्यावर इतके अस्ताव्यस्त लागली की, अन्य वाहन चालकांना चुकीच्या दिशेने आपली वाहने वळवावे लागली. पार्किंगसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजू त्याही अर्ध्यापर्यंत वापरणाऱ्या हॉटेल संचालकावर कारवाई होईल का, असा संतप्त सवाल संतापाने विचारला गेला.
रविवारी दुपारी १.१५ च्या सुमारास ग्रँड महफिलसमोरील पार्किंगची अल्पसी जागा ‘फुल्ल’ झाल्यावर १०० पेक्षा अधिक चारचाकी अवैध पार्किंग करण्यात आल्याने या वर्दळीच्या रस्त्यावर ‘चक्काजाम’चे स्थिती काहींनी अनुभवली. ग्रँड महफिलमधील कार्यक्रमात सहभागी झालेल्या ‘बड्यां’ची वाहनांमुळे रस्ताच व्यापल्याची माहिती एका वाचकाने ‘लोकमत’ला दिली. प्रत्यक्ष जावून पाहिले असता पार्किंगचे विदारक अवस्था लक्षात आली. मात्र रस्ता व्यापलेल्या या चारचाकींवर कुठलीही कारवाई झाली नाही. किंवा जामर लागला नाही. ‘नो पार्किंग किंवा रस्त्यावर दुचाकी लावल्यास दंड लावण्यात येतो. मात्र येथे हॉटेल संचालक आणि त्यांच्या पाहुण्यांनी अख्या रस्ताच गिळंकृत केला असतानाही त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही, असा रोष ये-जा करणाऱ्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)