उधारीच्या पैशाचा तगादा व्यवसायिकाची आत्महत्या

By Admin | Updated: February 5, 2016 00:18 IST2016-02-05T00:18:00+5:302016-02-05T00:18:00+5:30

उधारीच्या पैशांचा तगादा लावल्याने मानसिक तणावात येऊन एका व्यवसायिकाने विष पिऊन आत्महत्या केली.

Suspicious money launderer's suicide | उधारीच्या पैशाचा तगादा व्यवसायिकाची आत्महत्या

उधारीच्या पैशाचा तगादा व्यवसायिकाची आत्महत्या

छायानगरातील घटना : तिघांना अटक
अमरावती : उधारीच्या पैशांचा तगादा लावल्याने मानसिक तणावात येऊन एका व्यवसायिकाने विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायकांळी उघडकीस आली. याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी तिघांना अटक केली असून तिघेपसार झाले आहेत.
पोलीस सूत्रानुसार, उसद ऊल्ला इस्माम ऊल्ला (३८,रा. छाया नगर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी शेख फैय्याज ऊर्फ बबलु (३६,रा. नमुना), जावेद फिरोज खान (३१,रा. आझाद कॉलनी), राजा हुसेन करामत हुसेन (३०,रा. छायानगर) यांच्यासह शोएब खान, आरीफ लेंड्या व राजा नावाच्या युवक अशा तीन जणांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला. मृत असद ऊल्ला यांचे छाया नगरात जनरल स्टोअर्स चे दुकान आहे. त्याने अनेकांजवळून उधार पैसे घेतले आहे. आरोपीकडूनही असद याने लांखो रुपये घेतल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये शेख फैय्याजकडून असदने ८० हजार रुपये उधार घेतले आहे. उधारी अधिक झाल्यामुळे असद यांच्यावर कर्जाचे डोंगर होते. पैसे देणाऱ्यांनी असदकडे पैसे परत करण्याचा तकादा सुध्दा लावला होता. त्यातच असदला धमकावून मारहाण केली होती. या त्रासाला कंटाळून अखेर असदने बुधवारी दुपारी विषप्राशन केले. असद उठत नसल्याचे पाहून असतम जबीन यांनी तत्काळ पतीला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर असमत जबीन यांनी असदला घरी नेले. त्यावेळी असदने लिहेलिही चिठ्ठी असमत यांच्या हाती लागल्यावर त्यांनी तत्काळ नागपुरी गेट पोलिसांना माहिती दिली. तेव्हा असदच्या आत्महत्येस सहा जण कारणीभूत असल्याचा उघड झाले. पोलिसांनी असमद जबीन यांच्या तक्रारीवरून ६ जणांविरुध्द भादंविच्या कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून तीन जणांना अटक केली तर तीन आरोपी अद्यापही पसार आहेत. आरोपी शेख फैय्याज हा उपमहापौर शेख जफर शेख जब्बार यांचा जावई आहे. (प्रतिनिधी)

मृताने आरोपींसह अनेकांजवळून विविध प्रकारचे आमिष दाखवून पैसे घेतल्याचे चौकशीत पुढे आले. त्यांनी पैसे परत करण्याचा तगादा लावल्यान आत्महत्या केल्याचे चिठ्ठीत नमूद आहे. त्याआधारे ६ जणांविरुध्द गुन्हा नोंदविला.
-दत्ता गावडे, पोलीस निरीक्षक.

Web Title: Suspicious money launderer's suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.