तिवसा नगरपंचायतीच्या बुधवारच्या सभेला स्थगिती

By Admin | Updated: December 17, 2015 00:28 IST2015-12-17T00:28:11+5:302015-12-17T00:28:11+5:30

तिवसा नगरपंचायतीच्या पाच विषय समितींच्या अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी बुधवारी सभा बोलविण्यात आली होती.

Suspension on Wednesday's meeting of Tivasa Nagar Panchayat | तिवसा नगरपंचायतीच्या बुधवारच्या सभेला स्थगिती

तिवसा नगरपंचायतीच्या बुधवारच्या सभेला स्थगिती

विषय समिती निवड : विभागीय आयुक्तांचा स्थगनादेश
अमरावती : तिवसा नगरपंचायतीच्या पाच विषय समितींच्या अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी बुधवारी सभा बोलविण्यात आली होती. तत्पूर्वी सत्तारुढ पक्षाच्या गटनेत्यांनी सोमवारी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल करुन या सभेला स्थगनादेश देण्याची विनंती केली होती. या प्रकरणात युक्तीवाद व दस्तऐवजांची पाहणी करुन विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी मंगळवाच्या सभेला स्थगनादेश दिला आहे.
तिवसा नगरपंचायतीच्या ९ डिसेंबरच्या सभेत विषय समिती सदस्य निवडीबाबत पीठासीन अधिकाऱ्यांनी चुकीची प्रक्रिया राबविल्याबाबत नगरपंचायतीच्या सत्तापक्षाचे गटनेते रामदास मेहेश्रे यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल करुन ही प्रक्रिया अन्य पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन पुन्हा राबविण्यात यावी, असे अपील अधिवक्ता ताम्हणे यांचेद्वारा दाखल केले होते. दरम्यान विषय समितीच्या अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी नगरपंचायतीची सभा बुधवार, १६ डिसेंबरला आयोजित करण्यात आली होती. मात्र, सोमवारी मेहश्रे यांनी आयुक्तांकडे सभेला स्थगिती देण्याबाबत विनंती अर्ज सादर केला होता. मंगळवारी आयुक्तांनी ताम्हणे यांचा युक्तिवाद ऐकला व सर्व दस्तऐवजांचे अवलोकन करुन सभेला स्थगनादेश दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Suspension on Wednesday's meeting of Tivasa Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.