मूल्यांकन न करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याच्या निलंबनाचा प्रस्ताव
By Admin | Updated: May 3, 2015 00:32 IST2015-05-03T00:32:35+5:302015-05-03T00:32:35+5:30
धडक सिंचन विहीर योजनेत मंजूर विहीरीचे विहीत मुदतीत हजेरी पट व मुल्याकंनाचा प्रस्ताव तहसिलदार .....

मूल्यांकन न करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याच्या निलंबनाचा प्रस्ताव
दप्तरदिरंगाई : धडक सिंचन विहीर योजनेच्या कामात कुचराई
अमरावती : धडक सिंचन विहीर योजनेत मंजूर विहीरीचे विहीत मुदतीत हजेरी पट व मुल्याकंनाचा प्रस्ताव तहसिलदार कार्यालयाकडे सादर न केल्याने जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंता प्रतिक मावळे यांच्या निलंबन कारवाईचा प्रस्ताव मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या कडे सादर करण्यात आला आहे. भातकुली तालुक्यात धडक सिंचन विहीरीचे एकूण ४६ कामे ग्रामिण पाणीपुरवठा विभाग क्र २ यांच्या कडे देण्यात आले आहेत. शिवणी बु. येथे ३ सिंचन विहीरी मंजूर करण्यात आल्या आहेत. गावंडे नामक शेतकऱ्यांला सिंचन विहीर मंजूर झाल्याने त्यांच्या शेतात विहिरीच्या कामासाठी कनिष्ठ अभियंता यांनी विहिरीसाठी आखणी करून दिली होती त्यानुसार विहीरीचे खोदकाम सुरू केले होते.त्यानुसार तसे हजेरीपट तहसिल कार्यालयामार्फत १६ ते २२ एप्रिलपर्यंतचे कनिष्ठ अभियंता मावळे यांनी कामाचे मोजमाप घेऊन मूल्यांकनासह हजेतीपट कार्यालयात सादर करणे गरजेचे होते.जेणेकरूण कामाचा मोबदला मजुरांना तहसिल कार्यालयातून देण्यात आला असता. परंतु मूल्यांकन , हजेरीपट व मोजमाप पुस्तिका २४ एप्रिल पर्यत सादर केले नाही आणि याकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याने कारवाईचा प्रस्ताव उपअभियंता यांनी सादर केला आहे.
सिंचन विहिरीच्या कामावरील मजुरांचे हजेरीपट व मुल्यांकन अहवाल विहीत मुदतीत देण्यास टाळाटाळ करणे हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. अशा काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर नियमानुसार कारवाई कारवाई केली जाईल.
-किरण गीत्ते, जिल्हाधिकारी अमरावती.
याबाबत कारवाईच्या संदर्भात प्राप्त झालेल्या प्रस्तावाची पडताळणी करूण नियमानुसार पुढील कारवाई करून अंतिम निर्णयासाठी हा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविला जाईल
के.एम अहमद, उपमुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.
कनिष्ठ अभियंत्यानी सिंचन विहीरीचे हजेरीपट व मूल्यांकनाचा प्रस्ताव २२ एप्रिलपर्यंत सादर केला नाही परिणामी मजुरांना मोबदला देता आला नाही उलट ते रजेवर गेल्याने कारवाईचा प्रस्ताव कार्यकारी अभियंता यांच्याकडे सादर केला आहे
-आनंद दासवत, उपअभियंता
पाणीपुरवठा विभाग क्र. २.