रोपवाटिका अपहार, ग्रामसेवकाचे निलंबन
By Admin | Updated: March 31, 2017 00:19 IST2017-03-31T00:19:37+5:302017-03-31T00:19:37+5:30
अचलपूर पं.स.ची रविवारी झालेली वार्षिक आमसभा रोपवाटिका कागदोपत्री तयार करणाऱ्या तत्कालीन

रोपवाटिका अपहार, ग्रामसेवकाचे निलंबन
पंचायत समिती आमसभा वादळी : सरपंचांची पाठ, अनेक मुद्यांवर खडाजंगी
परतवाडा : अचलपूर पं.स.ची रविवारी झालेली वार्षिक आमसभा रोपवाटिका कागदोपत्री तयार करणाऱ्या तत्कालीन ग्रामसेवकाच्या निलंबनाचा ठराव, अधिकाऱ्यांची दांडी, भ्रष्टाचाराचे आरोप, सभापतीच्या निवडणुकीत सदस्याचे बेपत्ता राहणे आदी विषयांवरून चांगलीच गाजली.
रविवारी अचलपूर पंचायत समितीची वार्षिक आमसभा मेळघाटचे आ.प्रभुदास भिलावेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सभापती देवेंद्र पेटकर, उपसभापती सोनाली तट्टे, बीडीओ बाळासाहेब रायबोले, जि.प.सदस्य आशा वानरे, शिल्पा भलावी, पं.स.सदस्य कविता बोरेकर, सुनील तायडे, विणा ठाकरे, आइशष जावरकर, सुनीता दांडे आदींची उपस्थिती होेती.
यावेळी गौलखेडा कुंभी येथे सन २०११ मध्ये रोहयो अंतर्गत २५ लक्ष रूपये खर्चुन रोपवाटिका तयार करण्यात आली. मात्र, रोपे तयार न करता लाखोंचा मलिदा तत्कालीन ग्रामसेवक गोहत्रे यांनी लाटल्याचे चौकशीत उघडकीस आले. अंजनगाव पं.स.मध्ये कार्यरत सचिवाच्या निलंबनाचा ठराव घेण्यात आला. कांडली, देवमाळी, गौरखेडा कुंभीसह इतर ग्रा.पं.मध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गावंडे यांनी तक्रारींद्वारे करून संबंधितांवर कुठलीच कारवाई झाली नसल्याने सभेत एकच हंगामा झाला. शिक्षण विभाग शिक्षणात ढ असल्याचे आमसभेत स्पष्ट झाले. जि.प.अंतर्गत १२९ शाळा असून त्यांवर गट शिक्षणाधिकऱ्यांनी एकाही शाळेला वर्षभरात भेट दिली नाही. अनेक शाळा क आणि ड श्रेणीत असताना अचलपूर पं.स.ला आयएसओए प्रमाणपत्र दिले जाते. (तालुका प्रतिनिधी)