आरोग्य विभागातील तीन कर्मचारी निलंबित

By Admin | Updated: May 23, 2014 23:33 IST2014-05-23T23:33:05+5:302014-05-23T23:33:05+5:30

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात पुरुष आरोग्य सेवक व आरोग्य सहायकांच्या प्रशासकीय बदली यादीत घोळ केल्याप्रकरणी जि.प.आरोग्य विभागातील वरिष्ठ प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन

Suspended three employees in the health department | आरोग्य विभागातील तीन कर्मचारी निलंबित

आरोग्य विभागातील तीन कर्मचारी निलंबित

अमरावती : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात पुरुष आरोग्य सेवक व आरोग्य सहायकांच्या प्रशासकीय बदली यादीत घोळ केल्याप्रकरणी जि.प.आरोग्य विभागातील वरिष्ठ प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी व कनिष्ठ सहायक अशा तीन कर्मचार्‍यांना मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी शुक्रवारी निलंबित केले. या कारवाईमुळे जि.प.च्या प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. निलंबित कर्मचार्‍यांमध्ये वरिष्ठ प्रशासन अधिकारी ए.डी.काळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी वैशाली टवलारे, कनिष्ठ सहायक हेमंत यावले यांचा समावेश आहे. आरोग्यसेवक, आरोग्य सहायकांंच्या प्रशासकीय बदलीपात्र कर्मचार्‍यांच्या यादीत अनियमितता केल्याचे प्रकरण गुरुवारी समुपदेशनाने आॅनलाईन बदली प्रक्रियेदरम्यान उघडकीस आले होते. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात विविध ठिकाणी कार्यरत आरोग्यसेवक, सहायक आरोग्य सेवकांच्या बदल्यांची अंतिम यादी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी व जिल्हा आरोग्य अधिकारी राजेश पराडकर यांच्या स्वाक्षरीने मंजूर करुन फलकावर प्रसिद्ध करण्यात आली होती.

Web Title: Suspended three employees in the health department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.