'सीपीं'च्या राष्ट्रपती पदकाला स्थगिती द्या
By Admin | Updated: February 4, 2015 23:05 IST2015-02-04T23:05:33+5:302015-02-04T23:05:33+5:30
राणा लँडमार्क फसवणूक प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेले पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांची चौकशी करण्यात यावी. चौकशीचा निर्णय येईस्तोवर पोलीस आयुक्तांना घोषित झालेल्या

'सीपीं'च्या राष्ट्रपती पदकाला स्थगिती द्या
पत्रपरिषद : राणा लँडमार्क फसवणूकग्रस्तांची मागणी
अमरावती : राणा लँडमार्क फसवणूक प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेले पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांची चौकशी करण्यात यावी. चौकशीचा निर्णय येईस्तोवर पोलीस आयुक्तांना घोषित झालेल्या राष्ट्रपती पदकाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी 'राणा लँडमार्क' पीडितांनी बुधवारी एका पत्रपरिषदेद्वारे केली. या पत्रपरिषदेला फसवणूक झालेले महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फसवणूकग्रस्त गुंतवणुकदारांच्या तक्रारीनुसार, अमरावतीत 'राणा लँडमार्क प्रा.लि.' या कंपनीने गृहसंकुल बांधून देण्याचा करार करून ९६१ लोकांकडून कोट्यवधी रुपयांची रक्कम स्वीकारली. अनेकांनी पदरमोड करून रक्कम गुंतविली. तीन वर्षांनंतरही प्रकल्पउभारणीला सुरुवात झाली नाही. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार केली. प्रकरणाचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे यांनी योगेश राणा याला अटक केली. तथापि, मास्टरमार्इंड असलेल्या चंद्रशेखर राणा याला फरार होण्यास संधी दिली. चंद्रशेखर राणा हा आलिशान वाहनात शहरभर फिरतो. तपास अधिकारी अणे यांच्यावरील विश्वास उडाल्यामुळे त्यांची बदली करण्याची मागणी आम्ही पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांना केली. परंतु शहर दलात अणे हे एकमेव प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, असा पवित्रा मेकला यांनी घेतला. बाब प्रतिष्ठेची केली. आश्चर्य असे की, रूजू झाल्यापासून मेकला यांनी एकदादेखील आम्हाला भेटीसाठी वेळ दिली नाही.