पाळा मार्गावर संशयितांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:13 IST2021-02-10T04:13:48+5:302021-02-10T04:13:48+5:30

बडनेरा : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकोला नाक्याजवळील पाळारोडवर दरोड्याच्या प्रयत्नात शस्त्रसज्ज असलेल्या पाच जणांना अटक करण्यात आली. पोलीस ...

Suspects arrested on the way back | पाळा मार्गावर संशयितांना अटक

पाळा मार्गावर संशयितांना अटक

बडनेरा : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकोला नाक्याजवळील पाळारोडवर दरोड्याच्या प्रयत्नात शस्त्रसज्ज असलेल्या पाच जणांना अटक करण्यात आली.

पोलीस सूत्रांनुसार, मनोज ऊर्फ कोक्या बुद्धम ढोके (२५, रा. राहुलनगर, बडनेरा), राजेश नरेंद्र चौधरी (५०, रा. सुभाष चौक, नवी वस्ती), शैलेश ऊर्फ छकुला नामदेव गणवीर (२०), शेख रशीद शेख भुरू (१९) स्वप्नील लक्ष्मण भेंडारकर (२८, तिघेही रा. मिलचाळ, नवी वस्ती) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन सुरे, दोन काठ्या, मिरची पावडर, नायलॉन दोरी असे साहित्य जप्त करण्यात आले. त्यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३९९ सहकलम १४२ मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अटक करण्यात आलेले सर्व जण तडीपार आहेत.

पोलीस उपनिरीक्षक प्रशांत डगवार यांच्या नेतृत्वात सोमवारी रात्री ९च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास सहायक उपनिरीक्षक गजानन बोरवार करीत आहेत.

-----------

Web Title: Suspects arrested on the way back