संशयित आरोपी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:10 IST2020-12-27T04:10:45+5:302020-12-27T04:10:45+5:30
---------------------------------------------------------- पानटपरीवर जुगार पकडला अमरावती : बडनेरा पोलिसांनी नेमानी गोडावूनजवळील एका पाणटपरीवर कारवाई करून जुगार साहित्यासह १५,५५० मुद्देमाल जप्त ...

संशयित आरोपी ताब्यात
----------------------------------------------------------
पानटपरीवर जुगार पकडला
अमरावती : बडनेरा पोलिसांनी नेमानी गोडावूनजवळील एका पाणटपरीवर कारवाई करून जुगार साहित्यासह १५,५५० मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. वृषभ ऊर्फ सुमित सुधाकर हरणे (२३, रा. म्हाडा कॉलनी), नवनीत विष्णुपंत मेहेरे (४५, रा. कंपासपुरा बडनेरा) या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.
----------------------------------------------------
कुंभारवाडा येथे अवैध दारू पकडली
अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी येथील कुंभारवाडा येथे कारवाई करून ६०० रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. याप्रकरणी ५० वर्षीय एका महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
------------------------------------------------
नालीत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला
अमरावती : नाली एका इसमाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी त्याला इर्विन रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. प्रवीण नावाचा इसम असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मृताच्या नातेवाईकांचा शोध पोलीस घेत आहे.
----------------------------------------------
महाजनपुर्यात दारू पकडली
अमरावती : खोलापुरीगेट पोलिसांनी येथील महाजनपुऱ्यातून गुरूवारी ९०० रुपये किमतीची अवैध दारू जप्त केली. आरोपी संतोष रामदास गडलिंग (४३, रा. महाजनपुरा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.