शहानूर नदीत बुडणाऱ्या मुलाचे वाचले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:13 IST2021-09-27T04:13:50+5:302021-09-27T04:13:50+5:30

अंजनगाव सुर्जी : स्वतःचा जीव धोक्यात घालून एका इसमाने शहानूर नदीपात्रात बुडालेल्या १३ वर्षीय मुलाला वाचविले. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ...

Survived life of a child drowning in Shahnoor river | शहानूर नदीत बुडणाऱ्या मुलाचे वाचले प्राण

शहानूर नदीत बुडणाऱ्या मुलाचे वाचले प्राण

अंजनगाव सुर्जी : स्वतःचा जीव धोक्यात घालून एका इसमाने शहानूर नदीपात्रात बुडालेल्या १३ वर्षीय मुलाला वाचविले. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खोडगावनजीक नदीपात्रात ही घटना घडली.

आयुष अरुण असलमोल असे मुलाचे व अशोक पिंजरकर (दोघेही रा. अंजनगाव सुर्जी) असे त्याला वाचविणाऱ्या इसमाचे नाव आहे. खोडगावजवळ काही तुटफुट झालेल्या मूर्ती नदीत विसर्जित केल्यानंतर काही मुले अतिशय कमी पाण्यात आंघोळ करून बाहेर निघताना आयुष हा अचानक पाय घसरून पडला व प्रवाहात लागला. अशोक पिंजरकर यांचे लक्ष जाताच त्यांनी नदीपात्रात उडी घेतली. मात्र, तो पुढे निघून गेला होता. अशोक पिंजरकर यांनी पाण्यात बुडी घेऊन त्याचे टी-शर्ट पकडून पाण्यावर खेचले. खोल पाण्यात पायाला दगड लागल्याचे जाणवताच त्यांनी समयसूचकता ठेवून डाव्या पायाला खाली लागलेल्या जमिनीचा आधार घेत मुलाला बाहेर काढले व त्याचा जीव वाचविला.

Web Title: Survived life of a child drowning in Shahnoor river