शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

अवैध धंद्याचा केंद्रबिंदू ठरतोय सर्व्हे क्रमांक १२६!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 05:00 IST

१२६ मधील गुजरी बाजाराने आपले अस्तित्व केव्हाचे हरविले आहे . बाजाराच्या ठिकाणी टिनाचे शेड आणि काही ठिकाणी पक्के बांधकाम करून अतिक्रमण धारकांनी गुजरी बाजाराला ग्रहण लावले आहे. हे ग्रहण हटविल्याशिवाय शहराचे विकास होणे अशक्य आहे. याकरिता नगरपंचायतीने अतिक्रमण मोहिम राबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात राजकीय अडसर निर्माण करण्यात आला. अतिक्रमण मोहीम थांबविण्यात आली.

ठळक मुद्देअतिक्रमणाचा विळखा : विकासात अडथळा

श्यामकांत पाण्डेय ।लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : आदिवासी बहुल मेळघाटातील आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या धारणी शहराला सध्या विकासाचे वेध लागले आहेत. मात्र शहराच्या विकासासाठी अतिक्रमण हा सर्वात मोठा अभिशाप ठरत आहे. तर येथील प्रसिद्ध सर्व्हे क्रमांक १२६ हा अवैध धंद्यांचा केंद्रबिंदू ठरत आहे. नगरपंचायतीने विकासाच्या दृष्टिकोनातून अतिक्रमण हटवण्याची कारवाई प्रारंभ केली असली, तरी त्यात गुजरी बाजारातील राजकीय अतिक्रमण अडसर ठरत आहे.इंग्रज काळापासून सर्व्हे नंबर १२६ हा गुजरी बाजार म्हणून ओळखला जातो. पूर्वी या बाजारात तंबू लावून दुकाने लावली जात असे. मात्र १५/२० वर्षांपासून ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य आणि सध्याचे नगरपंचायतीचे काही नगरसेवकांनी हित साधण्यासाठी हा सर्व्हे क्रमांक प्रशासकीय लालफितशाहीत अडकविल्याचा आरोप आहे.१२६ मधील गुजरी बाजाराने आपले अस्तित्व केव्हाचे हरविले आहे . बाजाराच्या ठिकाणी टिनाचे शेड आणि काही ठिकाणी पक्के बांधकाम करून अतिक्रमण धारकांनी गुजरी बाजाराला ग्रहण लावले आहे. हे ग्रहण हटविल्याशिवाय शहराचे विकास होणे अशक्य आहे. याकरिता नगरपंचायतीने अतिक्रमण मोहिम राबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात राजकीय अडसर निर्माण करण्यात आला. अतिक्रमण मोहीम थांबविण्यात आली. शहराच्या विकासासाठी अडसर ठरणारे अतिक्रमण काढण्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपंचायतीची असताना व ते काढीत असताना राजकारण्यांनी त्यात नाक खुपसू नये, अशी सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे. १२६ हा सर्व्हे क्रमांक, तू जागा शहराचे हृदयस्थळ आहे. यात झालेले अतिक्रमण संपवून दुकानांची निर्मिती केल्यास शहराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून एक नवीन विकासाचा अध्याय सुरू होणार होता. मात्र, राजकीय दबावापोटी नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांनी अतिक्रमण मोहीम तीन महिने पुढे ढकलली. त्यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसणार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. यात राजकीय लोकांनी अडथळा निर्माण करू नये, अशी अपेक्षा आहे.नगरपंचायतमार्फत सर्व्हे क्रमांक १२६ मध्ये ओटे निर्मितीची निविदा काढण्यात आली. त्यानुसार शंभर ओटे बांधून अतिक्रमणधारकांना देण्याचा नगरपंचायतीचा मानस आहे. मात्र काही अतिक्रमण धारकांनी राजकीय दबावाचा वापर करून अडथळा निर्माण केला. - शैलेंद्र जांबेकरनगराध्यक्ष, नगरपंचायत, धारणी . 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण