प्राचार्यांच्या दालनात विद्यार्थ्यांचा घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:15 IST2021-07-07T04:15:33+5:302021-07-07T04:15:33+5:30
अमरावती : येथील श्री कला व वाणिज्य महाविद्यालयात उन्हाळी-२०२१ परीक्षांचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ५० रुपये घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी ...

प्राचार्यांच्या दालनात विद्यार्थ्यांचा घेराव
अमरावती : येथील श्री कला व वाणिज्य महाविद्यालयात उन्हाळी-२०२१ परीक्षांचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ५० रुपये घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी अभाविपने प्राचार्यांच्या दालनात घेराव घातला. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले. परीक्षा शुल्कमाफीचा प्रश्न सोडविला आणि ऑनलाईनचे घेण्यात येणारे ५० रुपयेसुद्धा वाचविले. यावेळी विद्यार्थ्यांनी निवेदन सादर केले.
अभाविपचे चिन्मय भागवत यांच्या नेतृत्वात शिष्यवृत्ती, परीक्षा शु्ल्क माफीसंदर्भात धडक देण्यात आली. यावेळी प्राचार्य स्मिता देशमुख यांच्याशी चर्चा करताना विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यात आले. यावेळी समर्थ रागीट, विवेक भारड, अभिषेक भेंडे, रोहन देवलसी, विशेष टेंभरे आदी उपस्थित होते.
--------------------
कोणत्याही विद्यार्थ्याकडून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अतिरिक्त पैसे घेतले नाही. किंबहुना ३० टक्के परीक्षा शुल्क माफी मिळावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. मात्र, लगेच हे शुल्क माफ करता येणार नाही. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी वेगळे करूनच शु्ल्क माफी द्यावी लागेल.
- स्मिता देशमुख, प्राचार्य, कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावती.
---------------
शासनादेशाप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षात ३० टक्के परीक्षा शुल्क घेऊ नये, असे स्पष्ट केले आहे. तरीही शिवाजी कला, वाणिज्य महाविद्यालयात ते घेण्यात येत होते. ऑनलाईन परीक्षा अर्ज सादर करण्याचे ५० रुपये घेण्यात आले. या बाबी प्राचार्यांच्या लक्षात आणून दिल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना न्याय मिळाला.
- चिन्मय भागवत, अभाविप, शहर महामंत्री